नाशिकरोड : देवळालीगाव रोकडोबावाडीजवळील डोबी मळा परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून शेतकरी व मजुरांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून डोबी मळ्यात पिंजरा लावण्यात आला आहे.वालदेवी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वालदेवी नदी दुथडी भरून वाहत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसभर झाडा-झुडपात व जंगलात दडून बसणारे बिबटे हे पाणी पिण्यासाठी वालदेवी नदी परिसरात येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून आर्टिलरी सेंटरच्या कुंपणालगत असलेल्या डोबी मळ्यात शेतकरी व मजुरांना बिबट्या व त्याच्या बछड्याचे दर्शन झाल्याने शेतात काम करण्यासाठी शेतकरी व मजूर धजावत नाही. दोन दिवसांपूर्वीच जयभवानीरोड अश्विनी कॉलनीत बिबट्या येऊन लागलीच आर्टिलरी सेंटरमध्ये धूम ठोकली होती. त्या पाठोपाठ डोबी मळ्यात तीन-चार बिबटे व त्याच्या बछड्याचे दर्शन झाले.
देवळालीगाव परिसरात बिबट्यासाठी पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 12:14 AM