निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथे बिबट्यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच पिंजरा लावण्यात आला.
चार दिवसांपूर्वी लक्ष्मण काकड यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू करण्यात आली होती. तेथे शेतात मका पिकात बिबट्या शिरला होता. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ येथे भेट दिली व पाहणी केली परंतु नंतर कोणीही तेथे फिरकले नव्हते. शनिवारी पहाटे ३ वाजता मोहन काकड यांच्या पुतण्याला बिबट्या परत दिसला असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायतीच्या पत्रावर पिंजरा लावण्याची मागणी करा, तेव्हाच पिंजरा लावण्यात येईल, असे सांगण्यात आले. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची धावपळ सुरू झाली.निऱ्हाळे येथे घटनास्थळी वन विभागाचे नारायण वैद्य दाखल झाले व व मक्याच्या पिकाजवळ पिंजरा लावण्यात आला.यावेळी कामगार, पोलीस पाटील शिवाजी शिंदे व माजी सरपंच आण्णा काकड, बाळासाहेब दराडे, गणेश यादव, दत्ता यादव, उपसरपंच विष्णू सांगळे व ग्रामस्थ उपस्थित होते.