पिळकोस : पिळकोस परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, काल रात्री बिबट्याने शांताराम अहेर बगडूकर यांच्या शेतात राहणाºया मेंढपाळाच्या वाड्यावरील वासरावर हल्ला करत त्याला जखमी केले आहे.बिबट्याच्या या हल्ल्याने शिवारात वास्तव्यास असलेले शेतकरी बांधव धास्तावले आहेत. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून सदर बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी पिळकोस येथील शेतकरी बांधवांकडून व पशुपालकांकडून होत आहे. वनपाल आर. एस. गुंजाळ यांनी पिळकोस येथे येऊन जखमी वासराचा पंचनामा करून परिसराची पाहणी करून शेतकºयांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.शांताराम आहेर बगडूकर यांच्या शेतात राहणाºया कचरू गोवेकर या मेंढपाळाच्या वाड्यावरील वासरावर हल्ला करत जखमी केले. मेंढ्यांच्या आवाजाने बिबट्याने पळ काढला. वनपाल आर. एस. गुंजाळ यांनी पिळकोस येथे येऊन जखमी वासराचा पंचनामा करून परिसराची पाहणी करत शेतकºयांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. रात्रीच्या वेळेस परिसर बिबट्याच्या डरकाळ्यांनी दणाणून जात असून, शेतकरी, पशुपालक व शिवारात वास्तव्यास असलेले ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीने धास्तावले आहेत.बिबट्याच्या उपद्रवामुळे शेळीपालन करणाºया आदिवासी बांधवांना पशुधनाच्या सुरक्षेसाठी रात्र जागून काढावी लागत आहे. परिसरातील बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी कौतिक मोरे, निवृत्ती सूर्यवंशी, दादाजी जाधव, प्रभाकर जाधव, बाजीराव जाधव, केवळ वाघ, बुधा जाधव, सुनील जाधव, अभिजित वाघ या शेतकºयांनी केली आहे.मेंगदर परिसरात बिबट्या येण्याचे प्रमाण महिनाभरापासून वाढले असल्याने या कालावधीत पिळकोस परिसरातील शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिसरात पुन्हा बिबट्याने धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळेस कांदा पिकाला पाणी देण्यासाठी जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 1:00 AM
पिळकोस : पिळकोस परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, काल रात्री बिबट्याने शांताराम अहेर बगडूकर यांच्या शेतात राहणाºया मेंढपाळाच्या वाड्यावरील वासरावर हल्ला करत त्याला जखमी केले आहे.
ठळक मुद्देपिळकोस : ग्रामस्थ भयभीतशेतकºयांना सतर्क राहण्याच्या सूचना