शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

हनुमानवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

By admin | Published: November 14, 2016 12:40 AM

हनुमानवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

नागरिक भयभीत : पिंजरा लावण्याची मागणीनाशिक : हनुमानवाडी परिसरातील कोशिरे मळ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास घडली़ शहराच्या मध्यवस्तीत येऊन बिबट्याने हल्ला केल्याने शेतकरी तसेच नागरिक भयभीत झाले आहेत. या परिसरात वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे़हनुमानवाडी परिसरात चंद्रकांत कोशिरे यांची आठ एकर शेती असून त्यामध्ये ज्वारी, मका व सोयाबीन, ऊस ही पिके घेतली होती़ ज्वारीचे पीक काढल्यानंतर उसाशेजारील शेतात त्यांनी पाच वासरे बांधलेली होती़ रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चंद्रकांत कोशिरे हे ट्रॅक्टर घेऊन शेतात जात होते़ त्यांना बांधलेले पाचपैकी एक वासरू दृष्टीस न पडल्याने त्यांनी जवळ जाऊन बघितले असता एका वासराच्या गळ्याजवळ मोठी जखम झाल्याचे आढळून आले़ त्यांनी या वासरास इतर वासरांपासून दूर नेऊन ठेवले़ कोशिरे हे काही वेळाने पुन्हा जखमी वासराकडे गेले असता त्याच्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केल्याचे आढळून आले़ मात्र तोपर्यंत वासराचा मृत्यू झाला होता़ याबाबत त्यांनी पोलीस ठाणे व वनविभागास माहिती दिली़ या दोघांनी घटनास्थळी पोहोचल्या व शोध घेतला मात्र त्यांना बिबट्या आढळून आला नाही़