सिन्नर : पांढुर्ली-विंचुरीदळवी शिवारातील चंद्रे वस्तीवर बुधवारी पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. विंचुरीदळवी शिवारातील चंद्रे वस्तीवरील नंदू कळमकर यांच्या जनावरांच्या गोठ्यात गाय व दोन वासरे बांधली होती. बुधवारी पहाटे बिबट्याने गोठ्यात असलेल्या वासरावर हल्ला चढवून त्याचा फडशा पाडला. यामुळे गायीने व दुसºया वासराने हंबरडा फोडल्याने शेतकरी जागे झाले. त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली असता, बिबट्याने धूम ठोकली. वन विभागातील कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 3:21 PM