नांदूरवैद्य : लोहशिंगवे येथील शेतकरी सुरेश दत्तू जुंद्रे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या गोठ्यात जाऊन बिबट्याने एका वासरावर हल्ला चढवला असून, या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली. सदर बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होता. अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिल्याचे येथील शेतकºयांनी सांगितले. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून, वनविभागाने कायमस्वरूपी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.सुरेश जुंद्रे यांच्या गोठ्यात दोरखंडाला बांधलेल्या वासरावर या बिबट्याने हल्ला चढवत या बछड्याला ठार केले आहे. घटनेची माहिती लोहशिंगवेचे सरपंच संतोष जुंद्रे यांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी विजय पाटील व वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याआधी जुंद्रे मळा परिसरात बिबट्याने अनेक हल्ले करण्याच्या घटना घडल्या असून, वनविभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. याआधी पिंजरा लावूनदेखील बिबट्या पिंजºयात येत नसल्यामुळे वनविभागाने यावर नवीन उपाय करणे गरजेचे आहे. या परिसरात आत्तापर्यंत तीन ते चार हल्ल्याच्या घटना घडल्या असून, नागरिक भयभीत झाले आहेत.बिबट्या आपले भक्ष्य शोधण्यासाठी शेतवस्तीवर येत असल्यामुळे या परिसरात ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तसेच या ठिकाणी ऊसशेती असल्यामुळे बिबट्याचा भक्ष्य शोधण्यासाठी या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वावर असल्याचे येथील शेतकºयांनी सांगितले. यामुळे या परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:08 PM
लोहशिंगवे येथील शेतकरी सुरेश दत्तू जुंद्रे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या गोठ्यात जाऊन बिबट्याने एका वासरावर हल्ला चढवला असून, या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली. सदर बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होता.
ठळक मुद्देग्रामस्थ भयभीत : पिंजरा लावण्याची वनविभागाकडे मागणी