लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : निमाच्या वतीने मुंबईत आयोजित मेक इन नाशिक उपक्र माची माहिती सिन्नर येथील मोठ्या उद्योगातील अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि नाशिकमध्ये अजून गुंतवणूक करावी, असे आवाहन निमातर्फे करण्यात आले. निमाच्या वतीने दि. ३० व ३१ मे रोजी मुंबईतील नेहरू सेंटर येथे मेक इन नाशिक या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक यावी, त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, अस्तित्वात असलेल्या उद्योगांना राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय गुंतवणूकदार आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती निमाचे सरचिटणीस डॉ. उदय खरोटे यांनी सिन्नर येथे दिली. या उपक्रमात सहभागी व्हावे म्हणून आवाहन करण्यात आले. या उपक्र माचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर यांनीही उपक्र माची माहिती दिली. निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार यांनी जवळपास एक हजार कोटी रु पयांची गुंतवणूक नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मुंबईत आयोजित या दोन दिवसांच्या काळात अनेक मोठे उद्योजक सामंजस्य करार करण्याची शक्यता आहे. यावेळी अतिरिक्त चिटणीस सुधीर बडगुजर, जिंदाल सॉ कंपनीचे सिन्हा यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन किरण खाबिया यांनी केले. यावेळी एस. के. नायर, सुरेंद्र मिश्रा, शिवाजी आव्हाड, प्रवीण वाबळे आदींसह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सिन्नरमध्येही गुंतवणूकदारांना हाक
By admin | Published: May 25, 2017 1:40 AM