कळवण : द्राक्ष पिकावरील रासायनिक अवशेष तपासणी अहवालाची माहिती भ्रमणध्वनी संदेश, व्हॉट्सअॅप, ई- मेलद्वारे मिळावी, अशी मागणी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी, निर्यातदार यांनी तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निर्यातदार विशिष्ट प्रयोगशाळेचा अट्टाहास करत आहेत. हा शेतकºयांवर अन्याय असून, इतर सरकारमान्य प्रयोगशाळांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. कोणत्याही अपेडा मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचा अहवाल निर्यातदारास मान्य असला पाहिजे, प्रयोगशाळेतून नमुन्याचा अहवाल प्रत्येक शेतकºयास त्याच्या वैयक्तिक मोबाइलवर संदेश, ई-मेल व व्हॉट्सअॅपद्वारे मिळाला पाहिजे. याआधी तपासणी झालेल्या पिकाचा अहवालही मेसेजद्वारे मिळावा. वरिष्ठांनी त्वरित तसे आदेश द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर अहवाल प्रत घेऊन शेतकरी आपल्या पसंतीच्या निर्यातदारास देऊ शकतील असेही निवेदनात म्हटले आहे. तपासणी अहवाल मेसेज, व्हाट्सअॅप अथवा ई-मेलवर पाठविण्यास असमर्थ ठरत असलेल्या अपेडा मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची मान्यता तत्काळ रद्द करावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी दीपक पगार, धनंजय जाधव, नीलेश वाघ यांनी केली आहे.
कळवण : द्राक्ष उत्पादकांची कृषी विभागाकडे मागणी तपासणी अहवाल व्हॉट्सअॅपद्वारे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:48 PM