नाशिक : ‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’, ‘म्हातारपणाची काठी’ असा समज करून मुलांचाच आग्रह धरणारे पालक, त्यापायी सुनांचा छळ करणारे लोक, त्यातून होणाºया दुर्घटना अशा घटना एकीकडे घडत असताना दुसरीकडे आनंदाचा स्त्रोत, लग्नानंतर दोन कुटुंबांना जोडणाºया, प्रेम-वात्सल्याचा झरा असणाºया मुली दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. मुलगी दत्तक घेतल्यावर घरात आनंद, समाधान आणि गोड, हवीहवीशी वाटणारी जबाबदारी आली असल्याच्या भावना मुलगी दत्तक घेणाºया पालकांनी व्यक्त केल्या आहेत. ठरवून मुलगीच दत्तक मागितल्यानंतर आणि प्रत्यक्षात मुलगी घरी आल्यानंतर झालेला आनंद अवर्णनीय असल्याचे या पालकांचे मत आहे. अशा पालकांशी संवाद साधला असता त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दात.मुली दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले दत्तक प्रकियेंतर्गत आजपर्यंत वंशाचा दिवा म्हणून दत्तकच घ्यायचे आहे तर मुलगाच घ्यावा, असा विचार करून मुलगा दत्तक घेण्याचे प्रमाण पूर्वी खूप होते. गेल्या काही वर्षांत ठरवून मुली दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले असून, मुलींनी आपल्या आयुष्यात चैतन्य, आनंद आणला असल्याच्या प्रतिक्रिया आता त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहे. आता दत्तकप्रकिया ‘कारा’ अंतर्गत केंद्रीयस्तरावर राबविली जात असल्याने इच्छित अपत्य केव्हा मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे प्रारंभी मुलाची मागणी करणारे पालक नंतर मुलाचा पर्याय बदलवून मुलगी दत्तक घेण्याची तयारी दर्शवत असून, मुलांच्या तुलनेत मुलींची दत्तकप्रकिया लवकर होत असल्याने इच्छुकांच्या पालकांच्या घरात लवकर आनंदाचे क्षण येत आहेत. अनाथाश्रम, आधारा श्रमासारख्या संस्था याबाबत पालकांचे प्रबोधन करीत असून समुपदेशनानंतर पालकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे निराधार मुलींना हक्काचे घर आणि आई-वडील मिळत असून, एक आशादायक चित्र निर्माण होऊ लागले आहे.
मेरे घर आयी एक नन्ही परी....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:19 AM