शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

हत्त्याकांडाच्या निषेधार्थ कॅम्प बंद

By admin | Published: October 30, 2014 12:09 AM

हत्त्याकांडाच्या निषेधार्थ कॅम्प बंद

देवळाली कॅम्प : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड येथे झालेल्या जाधव कुटुंबीयांच्या हत्त्याकांडाच्या निषेधार्थ व आरोपींना अटक करून कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी देवळाली कॅम्पला कडकडीत बंद पाळण्यात आला.जाधव कुटुंबीयांची हत्त्या होऊन आठ दिवसांचा कालावधी होऊनही अद्यापपर्यंत आरोपींना अटक न झाल्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने देवळाली कॅम्प बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंदमध्ये व्यापाऱ्यांनी स्वत:हून आपली दुकाने, व्यवहार बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. जुने बसस्थानक येथून रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निषेधार्थ घोषणा देत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. पी. पाटील यांना निवेदन दिले. मोर्चामध्ये माजी नगरसेवक दिनकर आढाव, मनसेचे जिल्हाप्रमुख सचिन ठाकरे, सिद्धार्थ पगारे, सुरेश कुसाळकर, राहुल काळे, अशोक किसावर, गणेश थामेत, भाजपाचे शशिकांत घुगे, मनसेचे शाखाप्रमुख भास्कर चौधरी, अशोक साळवे, सुरेश निकम, गौतम भालेराव, महेंद्र सोनवणे, राजेश भालेराव, अनिल ढेंगळे, गणेश शेजवळ आदि सहभागी झाले होते. सायंकाळनंतर बाजारपेठ पुन्हा गजबजून गेली होती. (वार्ताहर)