दिंडोरी : तहसील कार्यालयाच्या वतीने संगणकीकृत सातबारा उताऱ्यावरील हस्तदोष चूक दुरुस्तीसाठी गावोगाव शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी दिली आहे.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम १५५चे अभियानांतर्गत हस्तलिखित मूळ ७/१२ तसेच संगणकीकृत ७/१२ तयार करताना त्यात झालेल्या हस्तदोष चुका दुरुस्तीकामी दि. २२ जूनपासून प्रत्येक गावी ७/१२ संगणकीकरणांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण राज्यात महसूल दप्तरी ७/१२ संगणकीकरणाची मोहीम सुरू आहे. ७/१२ संगणकीकृत करताना कामकाजाच्या ओघात काही हस्तदोष झाल्याचे दिसून आले असून, त्या दुरुस्त करण्याकामी नागरिकांना तलाठी कार्यालयांमध्ये पाठपुरावा करावा लागत आहे. यात जनतेचा वेळ वाया जात असून, दप्तर दिरंगाईचा सूर जनतेत दिसून येत असल्याची बाब लक्षात घेऊन तहसील कार्यालयाने या विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.या शिबिरास दिंडोरी तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारीही उपस्थित राहाणार आहे. नागरिकांनी त्यांच्या मिळकतींच्या ७/१२ मध्ये झालेल्या हस्तदोषांच्या बाबतीत त्यांच्याकडील कागदोपत्री पुराव्यांसह अर्ज करावा व या शिबिरास हजर रहावे.
सातबारा उताऱ्यावरील हस्तदोष चूक दुरुस्तीसाठी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 12:00 AM
दिंडोरी : तहसील कार्यालयाच्या वतीने संगणकीकृत सातबारा उताऱ्यावरील हस्तदोष चूक दुरुस्तीसाठी गावोगाव शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी दिली आहे.
ठळक मुद्देप्रत्येक गावी ७/१२ संगणकीकरणांतर्गत विशेष शिबिर