१५ एप्रिल शुक्रवारपासून छावणी प्रशासनाने २७ रेमडेसिविरची मागणी करूनसुद्धा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्याबाबत अनास्था दाखविण्यात येत असून, कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविरसाठी धावपळ करावी लागत आहे. देवळाली छावणी परिषदेच्या दवाखान्यात दाखल रुग्णांपैकी २७ जणांना रेमडेसिविरची गरज असल्याने सदर मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. सदर इंजेक्शन मिळण्याकामी तीन दिवसांपासून मेल पाठवून छावणी परिषदेकडून दररोज मागणी नोंदवली जाते तसेच इंजेक्शन मिळावे, याकरिता कर्मचारी सकाळीच नाशिकला जातात. पण, सायंकाळपर्यंत त्यांना थांबवून सायंकाळी इंजेक्शन संपल्याची माहिती देण्यात येत आहे. याबाबत तातडीने इंजेक्शन न मिळाल्यास सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा जीवन गायकवाड, ॲड. बाळासाहेब आडके, सचिन ठाकरे, बाबुराव मोजाड, तानाजी करंजकर, तानाजी भोर, वैभव पाळदे, रोहित कासार, सुरेश निकम, सोमनाथ खताळे आदिंनी दिला आहे.
छावणी परिषदेला चार दिवसांपासून रेमडेसिविरची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:14 AM