नाशिक : खासगी क्लास परिसरातील टवाळखोरांचा वावर, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग, सायबर गुन्हे, याबाबत जनजागृती तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सोमवारपासून (दि़१९) विशेष मोहीम राबविली जाणार असल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी क्लासचालकांच्या बैठकीत केले़पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनानुसार शनिवारी (दि़१७) बराक नंबर १७ मध्ये खासगी क्लासचालकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी पोलीस उपायुक्त पाटील व सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी क्लास परिसरातील वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग, विद्यार्थिनींची सुरक्षितता, टवाळखोरी, सायबर गुन्हे याबाबत माहिती देण्यात आली़ तसेच क्लासेस चालकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या़ आणि त्यावर चर्चा करण्यात आली.यावेळी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, राज्य उपाध्यक्ष यशवंत बोरसे, शिवाजी कांडेकर, लोकेश पारख, अतुल अचलिया, मुकुंद रनाळकर, सामाजिक उपक्रम समन्वयक ज्योती वाघचौरे आणि क्लाससचे संचालक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 01:35 IST
खासगी क्लास परिसरातील टवाळखोरांचा वावर, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग, सायबर गुन्हे, याबाबत जनजागृती तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सोमवारपासून (दि़१९) विशेष मोहीम राबविली जाणार असल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी क्लासचालकांच्या बैठकीत केले़
खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मोहीम
ठळक मुद्देलक्ष्मीकांत पाटील : क्लासचालकांची बैठक