नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे अठ्ठेचाळीस तास शिल्लक राहिल्याने प्रचाराची रणधुमाळी वेग आला असून, दोन दिवस जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शुक्रवारी (दि.२१) प्रगती पॅनलच्या वतीने मोठी प्रचारफेरी काढून प्रचाराची सांगता केली जाणार आहे.येत्या रविवारी (दि.२३) नाशिक मर्चंट बॅँकेची निवडणूक होणार असून, त्यासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या तिन्ही पॅनलने जिल्हा पिंजून काढला आहे. शहरातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेषत: एक गठ्ठा मतदार मिळवण्यासाठी सर्वच पॅनल प्रयत्न करीत असून, ज्यांच्या शब्दाला मान आहे, अशा समाज आणि विविध संस्थांच्या नेत्यांना गाठून प्रचारासाठी प्रयत्न केले जात आहे.रविवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी आता अवघे काही तास शिल्लक असताना सर्वच पॅनलची धावपळ सुरू आहे. प्रगती पॅनलने मात्र सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे ठरविल्याने शुक्रवारी (दि.२१) मोठी प्रचार फेरी करून ५ वाजेच्या आत जाहीर प्रचार संपवला जाणार आहे. या निवडणुकीसाठी कोणतेही निर्बंध नसताना जाणीवपूर्वक आदर्श आचारसंहितेचे पालन पॅनल करीत असल्याचे वसंत गिते आणि हेमंत धात्रक यांनी सांगितले.सहकार पॅनलच्या वतीने मात्र नेहमीप्रमाणे सर्वच भागात उमेदवार प्रचार करतील, अशी माहिती गजानन शेलार यांनी दिली, तर नम्रता पॅनलच्या वतीनेदेखील महिंद्रा, बॉश यांसह अन्य मोठ्या कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर प्रचार केला जाणार असल्याचे अजित बागमार यांनी सांगितले.मृत सभासदांच्या नावावर मतदानाची भीतीया निवडणुकीसाठी आता विविध युक्त्या योजून मत मिळवण्याच्या हालचाली सुरू असतानाच २६ हजार मृत सभासदांच्या नावावर मतदान होण्याची भीतीदेखील व्यक्त होऊ लागली आहे. या मृत सभासदांच्या नावाने मतदान होऊ नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी काय दक्षता घेतात याकडे सामान्य सभासदांचे लक्ष लागून आहे.दरम्यान, नामको ट्रस्टमध्ये असलेला (कै.) हुकूमचंद बागमार यांच्या तसबिरीचे लोकार्पण पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले होते, प्रगती पॅनलने ही तसबीरच प्रचार कार्यालयात नेल्याचे सांगून बागमार यांनी त्यास आक्षेप घेतला आहे.
अखेरच्या टप्प्यात प्रचाराची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 1:39 AM
नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे अठ्ठेचाळीस तास शिल्लक राहिल्याने प्रचाराची रणधुमाळी वेग आला असून, दोन दिवस जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शुक्रवारी (दि.२१) प्रगती पॅनलच्या वतीने मोठी प्रचारफेरी काढून प्रचाराची सांगता केली जाणार आहे.
ठळक मुद्दे‘प्रगती’ची फेरी : ‘सहकार-नम्रता’चा प्रत्यक्ष भेटींवर भर