राज्यघटनेत समाविष्ट कलेल्या परिशिष्ट ९चा सत्ताधारी पक्षांनी वेळोेवेळी गैरफायदा घेतला आहे. या परिशिष्टात आतापर्यंत २८४ कायदे समाविष्ट करण्यात आले आहेत, ज्यातील बहुतेक शेती व्यवसाय व जमीन धारणासंबंधी आहेत. शेतकर्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच करणार्या या घटनादुरुस्तीचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे. असे निवेदनात म्हटले असून, परिशिष्ट ९ कायमचे रद्द करावे किंवा किमान त्यात समाविष्ट असलेले कमाल जमीन धारणा कायदा व आवश्यक वस्तू कायदा या परिशिष्टातून वगळावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे, कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले, सटाणा तालुकाध्यक्ष माणिकराव देवरे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव पूरकर, संतु पा. बोराडे, भीमराव बोराडे, सुकदेव पागेरे, दगू गवारे, रामनाथ ढिकले आदी उपस्थित होते. (फोटो १८ शेतकरी)
फोटो - अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे. समवेत माणिकराव देवरे, शंकरराव ढिकले .
===Photopath===
180621\18nsk_8_18062021_13.jpg
===Caption===
अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे. समवेत माणिकराव देवरे, शंकरराव ढिकले .