शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

योजना गुंडाळण्याचा ठराव रद्द करण्यासाठी ठिय्या

By admin | Published: September 08, 2015 10:44 PM

सटाणा : पुनंद धरणावर आरक्षण नसताना केली तीनशे दशलक्ष घनफूट मंजुरीची नोंद

सटाणा : कळवण तालुक्यातील पुनंद धरणामधून सटाणा शहरासाठी तीनशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याची खोटी नोंद करून शहरासाठी संजीवनी ठरणारी केळझर पाणीपुरवठा ही महत्त्वाकांक्षी योजना गुंडाळण्याचा ठराव नुकताच पालिका प्रशासनाने जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठविला असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी संतप्त शहरवासीयांनी हा ठराव तत्काळ रद्द करावा या मागणीसाठी पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ दोन तास ठिय्या दिला.सटाणा शहरातील पाण्याची गंभीर परिस्थिती पाहता व राजकीय विरोधामुळे शहरासाठी संजीवनी ठरलेल्या केळझर पाणीपुरवठा योजनेला लागलेला ब्रेक यामुळे आमदार दीपिका चव्हाण यांनी सटाणा शहरासाठी पुनंद धरणामधून पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे केली होती. मात्र संबंधित विभागाने केळझर योजना बंद केल्याशिवाय पुनंदचे पाणी मिळणार नाही, असा जावईशोध लावून पालिकेने तसा ठराव सादर करावा, असा लेखी खुलासा प्राधिकरणाने आमदार चव्हाण यांना दिला होता. त्यानुसार सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी वेळोवेळी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्याचाही प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी गटातील माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब सोनवणे, विरोधी पक्षनेते साहेबराव सोनवणे, मनोज सोनवणे यांनी ही महत्त्वाकांक्षी योजना गुंडाळण्याच्या ठरावास विरोध करून सत्ताधारी गटाचे मनसुभे उधळून लावले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बाळासाहेब सोनवणे, साहेबराव सोनवणे यांनी तालुक्यातील हक्काचे पाणी मिळणे अवघड होत असताना दुसऱ्या तालुक्यातून पाणी मिळणे अशक्य असल्याचे स्पष्ट करून ठरावास तीव्र विरोध केला. मात्र सत्ताधाऱ्यांनी त्याचा विरोध नोंदवून ठराव मंजूर करून घेऊन पालिकेला सादर केला. परंतु जीवन प्राधिकरण विभागाकडे सादर केलेल्या ठरावात चक्क पुनंद धरणामधून सटाणा शहरासाठी एक थेंबही पाण्याचे आरक्षण नसताना तब्बल तीनशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असल्याची खोटी नोंद करून योजना बंद करण्याचा ठराव सादर करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्याने संतप्त नगरसेवकांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या ठरावाला तीव्र विरोध करून रद्द करण्यासाठी अपिल अर्ज सादर केला. या अर्जावर सत्ताधारी गटाचे बाळासाहेब सोनवणे, मंदाकिनी सोनवणे, सुमनबाई सोनवणे, सुशीलाबाई रौंदळ, अनिल कुवर, रमण छाजेड या सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी गटाचे साहेबराव सोनवणे, मनोज सोनवणे, सिंधूबाई सोनवणे, नलिनी सोनवणे, उज्ज्वला सोनवणे, मुन्ना रब्बानी अशा बारा नगरसेवकांनी सह्या करून योजना गुंडाळण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी सरसावले. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेपासून पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच शहरवासीयांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी माजी नगरसेवक अरविंद सोनवणे यांनी सध्या शहरवासीयांना दहा दिवसाआडदेखील पाणी मिळत नसताना हक्काची योजना साठ टक्के पूर्ण होऊनही सत्ताधारी नगरसेवकांनी योजना बंद करण्याचे गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित केला. पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व कॉँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी शहरासाठी संजीवनी ठरणारी ही योजना बंद करण्याचा अट्टहास का, असा सवाल केला . जिल्हा परिषदेचे माजी सभापती यशवंत पाटील, लालचंद सोनवणे, देवेंद्र जाधव, अनिल सोनवणे, दिलीप येवला आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी केळझर पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आगामी काळात व्यापक स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असे स्पष्ट करून पालिकेने ही योजना बंद करण्याचा ठराव जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका यावेळी घेतल्याने नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण, गटनेते बाळासाहेब रौंदळ व काही सत्ताधारी नगरसेवकांनी आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन योजना बंद करण्याचा ठराव पुढील सर्वसाधारण सभेत रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात माजी नगरसेवक सुनील मोरे, श्यामकांत मराठे, दत्तू सोनवणे, अशोक सोनवणे, रामदास सोनवणे, सुभाष नंदन, शरद शेवाळे, मुन्ना सोनवणे, संदीप देवरे, श्रीधर कोठावदे, अण्णा अहिरे, जिभाऊ सोनवणे, पंकज सोनवणे, आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)