शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

प्रभावी उपचारपध्दतीने कॅन्सर होईल कॅन्सल : परिसंवाद

By admin | Published: April 24, 2017 9:36 PM

‘एक जीवन स्वस्थ जीवन’ या उपक्रमांतर्गत आयोजित परिसंवादात उमटला.

नाशिक : कर्करोग जरी गंभीर आजार असला तरी त्यावर प्रगत वैद्यकशास्त्राने प्रभावी उपचारपध्दती शोधली आहे. योग्यवेळी योग्य निदान आणि चाचण्या रुग्णाने करून घेतल्यास कर्करोग निश्चितपणे बरा होऊ शकतो, असा सूर ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ या उपक्रमांतर्गत आयोजित परिसंवादात उमटला. ‘कॅन्सरला करा कॅन्सल’ हे ब्रीद घेऊन ‘लोकमत आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ हा दहा दिवसांचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यभरात विविध कार्यक्रमांद्वारे कर्करोगाबाबत जागृती करण्यात येत आहे. याअंतर्गत नाशिकमध्ये आयोजित परिसंवादात मुंबई येथील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे सर्जिकल अ‍ॅन्कोलॉजिस्ट व रोबोटिक सर्जन डॉ. मंदार देशपांडे, डॉ. समीर तुळपुळे यांनी कर्करोगाची लक्षणे, निदान व उपचारपध्दतीबाबत माहिती देतानाच रुग्णांनी भयग्रस्त न होता पुर्वलक्षणे लक्षात घेऊन आवश्यक त्या चाचण्या वेळोवेळी करून घ्याव्या, असा सल्ला दिला. कर्करोगाशी लढा देऊन पुर्णपणे सावरलेल्या मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाइड क्विन होण्याचा बहुमान मिळविलेल्या नमिता कोहक तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनीही या परिसंवादात सहभाग घेतला. परिसंवादाचे सुत्रसंचालन डॉ. सुधीर संकलेचा यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल उपस्थित होते. याप्रसंगी विविध वैद्यकिय संघटनांचे पदाधिकारी डॉ. विकास गोऱ्हे, डॉ, संगीता बाफणा, डॉ. हेमंत सोननीस, डॉ. राजेश वळवी, डॉ. अमित पाटोळे, डॉ. अद्वैत अहेर, डॉ.नितीन रावते, डॉ. मृणालिनी किर्लोस्कर, डॉ. राजेश वसावे, डॉ. राजेश पाटील आदिंचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रारंभी लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक यांनी प्रास्ताविक केले व निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी मान्यवरांचे स्वागत केले.