कळवण : रोटरी क्लब, इनरव्हील क्लब व रोटरॅक्ट क्लब आॅफ कळवण यांच्या वतीने सुशीलाबाई दत्तात्रेय शिरोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिलांसाठी मोफत मेमोग्राफी व गर्भाशय कॅन्सर चाचणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. येथील उपजिल्हा रुग्णालय आवारात झालेल्या शिबिराचे उद्घाटन रोटरीचे माजी प्रांतपाल दादासाहेब देशमुख यांच्या हस्ते व तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, उपनगराध्यक्ष कौतिक पगार, रोटरीचे प्रोजेक्ट समन्वयक कुंदन चव्हाण, उपजिल्हा रु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगवंतराव लोंढे, नीलेश लाड,भूषण पगार, अजय मालपुरे, दीपक महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अमरावती रोटरीच्या दीड कोटी रुपयांच्या अत्याधुनिक व्हॅनद्वारे प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व डॉ. ज्योती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची कॅन्सरविषयक चाचणी करण्यात आली. विलास शिरोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष निंबा पगार, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष महानंदा अमृतकार, रोटरॅक्टचे अध्यक्ष स्वप्नील शिरोरे, जितेंद्र कापडणे, बापू कुमावत, गंगाधर गुंजाळ, डॉ. एस. बी. सोनवणे डॉ. आर. डी. भामरे, गंगा पगार, रोहन कोठावदे, संजय बगे, अविनाश पगार, राजेश मुसळे यांच्यासह रोटरी व इनरव्हीलचे सर्व सदस्य उपस्थित होते. रवींद्र पगार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पी. एच. कोठावदे यांनी आभार मानले.
कळवणला रोटरीतर्फे कर्करोग निदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:52 AM