लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींंच्या पोटनिवडणुका येत्या ८ डिसेंबर रोजी होणार आहेत. तथापि, ग्रामपंचायतींंच्या पाच वर्र्षांच्या कार्यकाळातील अवघे एक वर्ष शिल्लक असल्याने कागदपत्रांची जमवाजमव करत अर्ज दाखल करण्याला उमेदवार नापसंती दर्शवत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींत पोटनिवडणुकांसाठी उमेदवारच न मिळाल्याने त्या पुन्हा रिक्त ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे.तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एकेक प्रभागांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, तर देवडोंगरी येथील पाचही प्रभागांतील रिक्त जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले. देवडोंगरीप्रमाणेच प्रत्येकी एकेक प्रभागाच्या बिनविरोध निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये अंजनेरी, बेझे, मुरंबी, दलपतपूर, देवगाव, कळमुस्ते त्र्यंबक यांचा समावेश आहे. ११ ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदतीत कुणीच न आल्याने जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामध्ये वायघोळपाड, मूळवड, काचुर्ली, सापगाव, मेट चंद्राची, पेगलवाडी ना., सोमनाथनगर, होलदारनगर, शिवाजीनगर, आळवंड, आव्हाटे, विजयनगर आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.सापगावच्या एका जागेसाठी इच्छुकांचे एकमत न झाल्याने तेथे निवडणूक घेण्यात येणार आहे. या ठिकाणी दोन अर्ज आले असून, सरळ सामना होत आहे. उर्वरित ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून ८ डिसेंबरला मतदान होणार आहे़
पोटनिवडणुकांसाठी मिळेना उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 10:45 PM
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींंच्या पोटनिवडणुका येत्या ८ डिसेंबर रोजी होणार आहेत. तथापि, ग्रामपंचायतींंच्या पाच वर्र्षांच्या कार्यकाळातील अवघे एक वर्ष शिल्लक असल्याने कागदपत्रांची जमवाजमव करत अर्ज दाखल करण्याला उमेदवार नापसंती दर्शवत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींत पोटनिवडणुकांसाठी उमेदवारच न मिळाल्याने त्या पुन्हा रिक्त ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे.
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : ग्रामपंचायतीच्या जागा रिक्त