वि धानसभा निवडणुकीच्या छोट्या छोट्या प्रचार सभा, प्रचार फेºया, घरोघरी जाऊन प्रचार, मतदारांच्या भेटीगाठी तसेच मोठ्या नेत्याची जाहीर सभा अशी प्रचार यंत्रणा आता राबविली जाते. अशा प्रकारची प्रचार यंत्रणा सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वीदेखील राबविली जात होती. परंतु तेव्हाची प्रचार यंत्रणा आणि आताची प्रचार यंत्रणा यात कालानुरूप बदल झालेला दिसून येतो. पूर्वीच्या काळी आतासारखी परिस्थिती नव्हती. कार्यकर्ते आपल्या उमेदवारांसाठी जिवाचे रान करून प्रचार करीत असत. तसेच उमेदवारी मिळविण्यासाठीदेखील रस्सीखेच किंवा चढाओढ नव्हती. साधारणत: इ.स. १९७८ मधील विधानसभा निवडणुकीचा एक प्रसंग आठवतो.डाव्या विचारसरणीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमचे उमेदवार आदिवासी भागातून निवडणुकीसाठी उभे होते. त्याच मतदारसंघातून त्यांच्या विरोधात सुमारे ११ उमेदवार निवडणूक लढवत होते. त्यात काही अन्य पक्षांचे होते, तर काही अपक्ष होते. विशेष म्हणजे त्यात आमच्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात त्याचे सासरेदेखील निवडणुकीला उभे होते. त्यांनी ऐनवेळी माघार घेऊन आमच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. परंतु आमचे नेते काँम्रेड नरेंद्र मालुसरे यांनी योग्य राजकीय डावपेच आखून मुद्दाम कोणत्याही उमेदवाराला माघार घेऊ दिली नाही. निवडणुकीत उभ्या राहिलेल्या सासºयाचीच पंचाईत झाली. त्यामुळे अन्य उमेदवारांमध्ये मतांची विभागणी होऊन आमचे उमेदवार प्रथमच आमदार म्हणून निवडून आले. अन्य उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यानंतर सलग चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. त्यात एकदा तर नाशिक जिल्ह्यातून १५ पैकी १४ आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले. आमच्या पक्षाने मोठी झुंज देत आपला गड कायम राखला आणि एकमेव आमदार म्हणून त्या मतदारसंघातून आमचाच उमेदवार विजयी झाला. अशा प्रकारे आमच्या उमेदवाराने आतापर्यंत सातवेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळविला आहे.
उमेदवाराच्या सासऱ्याचीही झाली होती पंचाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:23 AM