नाशिक : यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अत्यल्प दिवस मिळाले. त्यातच अधिकृत प्रचारासाठी एकच सुटीचा वार मिळाल्याने हीच संधी साधून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सर्व प्रचार पर्वणी साजरी केली. रविवारी (दि.१३) शहरास जिल्ह्यात उमेदवारांनी परिसर पिंजून काढला.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंगत आली आहे. प्रचारासाठी प्रचारफेऱ्या आणि चौक सभा होत असून, जाहीरसभादेखील होत आहेत. निवडणुकीसाठी प्रचार तसा अगोदरच सुरू झाला असला तरी अधिकृत प्रचारासाठी वेळ कमी मिळाला आहे. त्यामुळे उमेदवारी मिळाल्यानंतर प्रत्येक तास महत्त्वाचा ठरला आहे. बहुतांशी उमेदवार पहाटे उठून प्रचाराचे नियोजन करतात आणि सकाळीच प्रचाराला बाहेर पडतात. रात्री उशिरापर्यंत प्रचार करीत आहेत. तहान भूक विसरून करताना कोणत्याही भागात प्रचारासाठी गेलो नाही, असे व्हायला नको यासाठी प्रत्येक परिसर पिंजून काढत आहेत.दरम्यान, रविवारचा दिवस असल्याने उमेदवारांनी संधी साधली. घरोघर प्रचारावर भर दिला. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि कारखान्यांमधील प्रशासकीय आस्थापनांना सुटी असल्याने त्या त्या क्षेत्रात उमेदवारांनी प्रचारावर भर दिला. त्या भागातील समस्या आणि प्रश्न मांडून त्यासंदर्भात प्रचार करण्यात आला. शहरातील अनेक भागांत यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.४गेल्या मंगळवारी (दि.७) माघारी झाल्यानंतर अधिकृत प्रचाराला ८ तारखेपासून प्रारंभ झाला. त्यानंतर हा एकच रविवार म्हणजे सुटीचा वार उमेदवारांना प्रचारासाठी मिळाला. येत्या शनिवारी (दि.१९) प्रचार संपेल त्यामुळे पुढील रविवारी प्रचार करता येणार नाही तर सोमवारी (दि.२१) थेट मतदानालाच सामोरे जावे लागणार आहे.
उमेदवारांनी साधला प्रचाराचा सुपरसंडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 1:29 AM
यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अत्यल्प दिवस मिळाले. त्यातच अधिकृत प्रचारासाठी एकच सुटीचा वार मिळाल्याने हीच संधी साधून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सर्व प्रचार पर्वणी साजरी केली. रविवारी (दि.१३) शहरास जिल्ह्यात उमेदवारांनी परिसर पिंजून काढला.
ठळक मुद्देसुटीचा वार : मतदारांच्या घरोघरी प्रचार