नाशिक : शहर व जिल्'ात अध्याप यूपीएससी परीक्षेचे केंद्र नसल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत रविवारी (दि.४) घेण्यात आलेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिकच्या सुमारे पाच ते सहा परीक्षार्थी उमेदवारांना मुंबई-पुण्याचा प्रवास करावा लागला.केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येत असलेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व नागपूर या सहा ठिकाणी परीक्षा केंद्रा असल्याने राज्यभरातील हजारो परीक्षार्थींना कोरोनाच्या संकटातही शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागला.नाशिकच्या परीक्षार्थींना ठाणे,मुंबई, नवी मुंबईसह पुणे ५ औरंगाबाद या परीक्षा केंद्रांचे पर्याय प्रवासाच्या दृष्टीने सोयीचे असले तरी बहुतांश परीक्षार्थिंनी मुंबई, ठाणे व पुणे येथील परीक्षा केंद्रंचा पर्याय निवडल्याचे दिसून आले. मात्र यूपीएससी परीक्षेसाठी करण्याच्या संकटात शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागणे परीक्षार्थी व पालकांमध्येही नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून आले. युपीएससीच्या परीक्षेसाठी नाशिक जिल्'ातून जवळपास नऊ ते दहा हजार परीक्षार्थी प्रविष्ट होत असतात. मात्र यावेळी कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांच्या संख्येत घट होण्याची शक्यता शहरातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनी व्यक्त केली आहे.