कनिष्ठ महविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घ काळापासून प्रलंबित असून, मागण्यांच्या पुर्ततेसाठी महाराष्टÑ राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षातील उपरोक्त बैठकींमध्ये मागण्या मान्य करून तसे लेखी आश्वासनही संघटनेस दिले व विधिमंडळात त्याबाबत निवेदनही केले. संघटनेने विद्यार्थीहितासाठी मंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन आंदोलन मागे घेतले; परंतु गेल्या दहा महिन्यांमध्ये सातत्याने पाठपुरावा करूनही अंमलबजावणी झाली नाही म्हणून पुन्हा महासंघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
चांदवडला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांचे नायब तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 6:44 PM