सिडको : अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने माजी अध्यक्षांची बैठक बोलावून नूतन अध्यक्षांचे नाव जाहीर केल्याने एकताच्याच दुसºया गटाच्या पदाधिकाºयांना विश्वासात न घेतल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी मागील निवडणुकीत आपल्याला अध्यक्षपदाचा दिलेला शब्द पाळला गेला नसल्याचा आक्षेप घेत रविवारी (दि. ६) आयमाच्या संस्थापक अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक घेतल्याचे वृत्त असून, या बैठकीत शब्द पाळण्यात यावा याबाबत सविस्तर चर्चा झाली. आयमाच्या अध्यक्ष व इतर पदाधिकाºयांचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपुष्टात येत असून, नव्या पदाधिकाºयांची निवडणूकप्रक्रिया घोषित झाली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकता पॅनलने दुसºया गटाच्या उमेदवारांना विश्वासात न घेता नवीन अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वरुण तलवार यांचे नाव घोषित केल्याने दुसºया गटामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे आता दुसºया गटाच्या पॅनलकडूनही व्यूहरचना आखण्यास सुरुवात झाली असून, या गटाची नुकतीच रविवारी (दि. ६) आयमाचे संस्थापक अध्यक्ष भास्कर कोतवाल, शशिकांत कोतवाल, मार्गदर्शक सुनील बागुल, माजी अध्यक्ष रमेश वैश्य, संजीव नारंग, विवेक पाटील, जे. जी. शिर्के, जी. आर. वाघ, एन. टी. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले उमेदवार तुषार चव्हाण यांनी मागील निवडणुकीच्या वेळी मला अध्यक्षपदाचा शब्द दिला असताना आता तो पाळला जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली असून, यामुळे निवडणुकीत अध्यक्षपदासाठी चव्हाण हे दावेदारी आणि उमेदवारी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.बिनविरोधच्या हालचालीअनेक वर्षे ही निवडणूक सर्वसंमतीने आणि वरिष्ठांच्या मध्यस्थीने बिनविरोध करण्याची परंपरा असून, यंदादेखील ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र दुसरीकडे अध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ असल्याची चर्चा आहे. गेल्यावर्षी अध्यक्षपदासाठी राजेंद्र अहिरे यांना संधी देण्यात आली त्यावेळी आयमामधील वरिष्ठांनी तडजोड करीत दुसºया गटाचे उमेदवार तुषार चव्हाण यांना पुढीलवेळी अध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता, असे त्यांचे समर्थक सांगतात. हा शब्द पाळला न गेल्यास यंदा मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगितले जात आहे.
अध्यक्षपदासाठी ‘एकता’च्या दुसऱ्या गटाकडूनही उमेदवार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:22 AM