वडनेर भैरव : चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथे ४६.५०० रु पये किमतीचा गांजा जप्त करण्यातआला.
पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी नाशिक ग्रामीण जिल्हाचा पदभार स्वीकारल्या पासून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकार्यानां आदेश दिलेले आहेत.त्यानुसार पोलीस निरीक्षक के.के.पाटील नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा,नाशिक ग्रामीण हे रविवारी(दि.११)पिंपळगाव बसवंत, वडनेर भैरव व चांदवड परिसरात अवैध धंध्याची माहिती काढून कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह पेट्रोलिंग करीत असताना शिरवाडे फाटा येथे गुप्त बातमीदाराने त्यांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली. कि, कानंमंडाळे शिवारात दत्तू यादव चौधरी (४५,रा.कानंमंडाळे) याने आपल्या मालकीच्या शेतात गांजा या अमली पदार्थाच्या झाडाची लागवड केलेली आहे. सदर माहितीवरून त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पाठवून खात्री केली. असता तूर या पिकाच्या आतमध्ये व इतर ठिकाणी गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे दिसून आल्याने छापा टाकला असता सदर ठिकाणी शेतात तूर या पिकाच्या आतमध्ये आरोपी दत्तु यादव चौधरी रा. कानमंडाळे ता.चांदवड याने त्याच्या मालकीच्या शेतात गांजा च्या सुमारे २३० झाडाची लागवड केल्याचे दिसून आले. ज्याचे एकूण वजन ९ किलो ३९० ग्रेम किमत अंदाजे ४६,५०० रु पये किमतीचा गांजा या अमली पदार्थाचा ओली झाडे जप्त करण्यात आलेली आहेत. व आरोपी विरु द्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई हि पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण शर्मिष्ठा वालावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साळवे मनमाड यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलीस निरिक्षक के. के. पाटील, स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस उपनिरीक्षक गुजर, पो. हवा. गोसावी, पो. हवा. चव्हाणके, पो. शि. गोसावी, मर्कंड, टर्ले, खांडेकर व वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहा. पो. निरिक्षक गणेश गुरव, सहा. पो. उपनिरीक्षक शेख, पो. ना. वाघ भोये यांच्या पथकाने केली आहे.