देवळाली कॅम्प : विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर घालत त्यांच्यात नवनिर्मितीचा ध्यास निर्माण करण्यासाठी अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन छावणी परिषदेचे नगरसेवक बाबुराव मोजाड यांनी केले. नाशिक जिल्ह्यातून फक्त देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलकरिता भारत सरकार नीती आयोगाच्या माध्यमातून अटल टिंकरिंग लॅबच्या उद्घाटनप्रसंगी मोजाड बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, नगरसेवक सचिन ठाकरे, भगवान कटारिया, प्रभावती धिवरे, मीना करंजकर, आशा गोडसे, कावेरी कासार, समितीच्या अध्यक्ष सुचित्रा दोंदे, प्रा. सुनीता आडके, चंद्रप्रीती मोरे, सुभाष बोराडे आदी उपस्थित होते. पुणे विद्यापीठात रेवती काळे, प्राजक्ता निर्मळ, ऐश्वर्या चव्हाण या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या उत्कृष्ट प्रकल्पामुळे ही अटल टिंकरिंग लॅब मिळाली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक नलिनी लोखंडे, विज्ञान विभाग प्रमुख राजश्री खैरनार, शिक्षक प्रमोद वैद्य, किरण जाधव, महेंद्र कापुरे, सौरभ देवरे, सुंदरदास देसले, अंकुश आव्हाड, अमृता तुपे, लॅब प्रमुख किशोर दयार, मंगल आंधळे, आदिती गायकवाड आदी उपस्थित होते.
कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये जिल्ह्यातील पहिली अटल लॅब कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:15 PM