शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

जेरबंद बिबट्याची मादी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात रवाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 2:14 PM

जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देदारणाकाठी संचार असल्याने खबरदारी गरजेचीमादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे

नाशिक : दारणाकाठी असलेल्या जाखोरी गावात जेरबंद झालेल्या बिबट्या मादीची शनिवारी (दि.४) बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात रवानगी करण्यात आली. मादी पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने काही प्रमाणात दारणाकाठावरील भय कमी झाले असले तरीही या भागात नर बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे वनविभागाच्या ट्रॅप कॅमे-याने टिपलेल्या छबींवरून स्पष्ट होते. यामुळे दारणाकाठालगतच्या गावकऱ्यांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.दारणाकाठालगत बिबट्यांचा वाढता संचार हा वनविभागाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी सातत्याने या भागात ट्रॅप कॅमेरे आणि पिंज-यांची संख्या वाढविली जात आहे. नाशिक पश्चिम व पुर्व भागाचे पथक दिवस-रात्र या परिसरात गस्तीवर आहेत. त्यांच्या मदतीला बोरिवलीचे गांधी उद्यानाचे पथकही कार्यरत आहे; मात्र या पथकांमध्ये असमन्वय निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पथकांना विश्वासात न घेता बोरिवलीवरून ‘पाहूणे’ आलेल्या पथकाने ‘एककलमी’ उपाययोजना राबविण्यास सुरूवात केल्याने स्थानिक पथकांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच मादी पिंज-यात अडकली त्यावेळी शेतातून पळताना दोन बिबटे शेतक-यांना नजरेसही पडल्याचे गावक-यांनी सांगितले. यामुळे वनविभागाने याठिकाणी पुन्हा दुसरा पिंजरा तैनात केला आहे. तसेच ट्रॅप कॅमेरेही बसविले आहेत. 

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव