सिडको : घरफोडी करणाऱ्या दोघा अल्पवयीन गुन्हेगारांना पकडण्यात अंबड पोलिसांना यश आले असून, या अल्पवयीन गुन्हेगारांकडून दोन लाखांचे सोन्याचे दागिने व नऊ मोबाइल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे सत्र सुरू असून, यात अल्पवयीन गुन्हेगारांचादेखील समावेश असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. गेल्या २९ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गणेश चौक येथील बालउद्यानाजवळ राहणाºया ज्येष्ठ महिला संध्या चव्हाण या काही कामानिमित्त त्यांच्या मुलीकडे गेल्या होत्या. तासाभराने आल्यानंतर त्यांच्या घरातील कपाटातून ४० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी अंबड पोलिसांना कळविले.पोलिसांनी ३० जून रोजी चव्हाण यांच्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला. सिडको व अंबड भागात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक तुषार चव्हाण यांनी याप्रकरणी दोघा अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केलेले नऊ मोबाइल हस्तगत केले. या मोहिमेत गुन्हे शोध पथकाचे तुषार चव्हाण यांच्यासह मारुती उघडे, भास्कर मल्ले, दत्तात्रय गवारे, दुष्यंत जोपळे, अविनाश देवरे, विजय वरंदळ,आदींचा समावेश आहे.चोरट्याकडून आठ मोबाइल जप्तइंदिरानगर : वडाळागाव परिसरातील पिंगुळबाग भागातील गुलशननगरमधून एका संशयिताला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ताब्यात घेतले असता त्याने मोबाइल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी आठ चोरीचे मोबाइल जप्त केले आहेत.घरातील मौल्यवान वस्तू, मोबाइल चोरी करणे यांसारख्या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त डॉ. श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले होते. इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची उकल करण्यासाठी संशयितांचा शोध घेण्यास गुन्हे शोध पथकाने सुरुवात केली. दरम्यान, पोलीस हवालदार रियाज सय्यद यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राजेश निकम, राजू राऊत, भगवान शिंदे यांच्या पथकाने गुलशननगरमधून संशयित सलीम युसूफ शेख (२८) यास शिताफीने अटक केली. त्याची कसून चौकशी के ली असता त्याने एका गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्याच्याकडून विविध घटनांमध्ये चोरी केलेले ६४ हजारांचे आठ मोबाइल हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिली.अल्पवयीन गुन्हेगारांची टोळी सक्रिय कोणताही गुन्हा केला तरी पोलीस आपले काहीच करू शकत नाही, असा गैरसमज बाळगणाºया अल्पवयीन गुन्हेगारांची टोळी सिडको भागात सक्रिय झाली आहे. या अल्पवयीन गुन्हेगारांकडून नागरिकांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने तसेच मोबाइल चोरी करण्याच्या तक्रारी वाढत असल्याने आता पोलीस यंत्रणाही या अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेत आहे.
अल्पवयीन गुन्हेगारांकडून दोन लाखांचे दागिने हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 1:33 AM
सिडको : घरफोडी करणाऱ्या दोघा अल्पवयीन गुन्हेगारांना पकडण्यात अंबड पोलिसांना यश आले असून, या अल्पवयीन गुन्हेगारांकडून दोन लाखांचे सोन्याचे दागिने व नऊ मोबाइल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठळक मुद्देनऊ मोबाइल जप्त : अंबड पोलिसांची कारवाई