पेठ : गुजरात राज्यातून पेन व त्यासाठी आवश्यक असणारे केमिकल घेऊन जाणारा अवजड ट्रकने चालत्या स्थितीत पेट घेतल्याने संपूर्ण ट्रक मालासह जळून खाक झाला. गुजरात राज्यातून पेन व त्यासाठी लागणारे रसायनाचे डबे भरलेला ट्रक गुजरात कडून नाशिककडे जात असतांना पेठ शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कापूरझीरा पाडयावरील पेट्रोलपंपाजवळून जात असतांना चालत्या ट्रकने अचानक पेट घेतला. केमीकलने पेट घेतल्याने आगीचे गोळे रस्त्यावर फेकले जाऊ लागले. त्याही परिस्थितीत चालकाने ट्रक पेट्रोल पंपापासून दुर अंतरावर नेऊन उभा करून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी उडी मारली. संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरात आगीचे व धूराचे लोट पसरले. तर रसायनाने भरलेल्या डब्यांनी पेट घेतल्याने त्यांच्या मोठा आवाज येत होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी भेट देऊन गर्दी पांगवली. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही तास थांबवण्यात आली होती. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरीही ट्रक व त्यातील मालाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
कापूरझिºयानजीकधावता ट्रक जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 1:27 AM
पेठ : गुजरात राज्यातून पेन व त्यासाठी आवश्यक असणारे केमिकल घेऊन जाणारा अवजड ट्रकने चालत्या स्थितीत पेट घेतल्याने संपूर्ण ट्रक मालासह जळून खाक झाला.
ठळक मुद्देआगीचे गोळे रस्त्यावर फेकले जाऊ लागलेमार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही तास थांबवण्यात आली