पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरात मिरचीचे पिक रोगांमुळे वाया जात असल्याने शेतकऱ्यांनी कोबी, टोमॅटो या पिकांतून सरासरी उत्पादन घेणे सुरू केले होते. मात्र यंदाच्या वातावरणाचा फटका या पिकांनाही बसला आहे. पहिल्या, दुसऱ्या दोन्ही टप्यातील कोबीचे पिक करपा ,खोड अळी अशा विविध रोगांना बळी पडल्याने शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाले आहे. मात्र महागडी औषधे फवारणी करून शेतकरी ते पिक वाचविण्याची धडपड करत आहेत. पिळकोस परिसरात मिरचीचे पीक खरीप हंगामातील प्रमुख पिक म्हणून पाहिले जायचे. मात्र मिर्चीचे पीकही रोगांना बळी पडू लागल्यामुळे मिर्चीच्या तुलनेत खर्चिक असलेल्या कोबी,टोमॅटो या पिकातून शेतकऱ्यांनी चांगले उतपन्न घेतले होते. परंतु दोन वर्षापासून कोबीच्या पिकातून खर्चही निघत नाही. एकतर बियाण्यात फसवणूक होत आहे अन्यथा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग हताश झाला आहे. एकीकडे पावसाअभावी पिके करपून चालली असून अशातही ज्यांनी शेती केली आहे, ते शेतकरी हे कोबी वाचवण्याची धडपड करत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या टप्यातील लागवड केलेले कोबीचे पिक रिंग करप्याने उद्वस्त झाले आहे. त्यामुळे पिकांवर महागडी कीटकनाशके फवारली जात आहेत.
वटारमध्ये पिके धोक्यातवटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयातील वटार,डोंगरे, विंचुरे,कंधाने परिसरात सुरूवातीला रिमझिम पाऊस आणि विहीरांच्या थोड्याफार पाण्यावर जगवलेली खरीप पिके पावसाने चांगलीच ओढ दिल्याने आता मात्र वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिळकोस:पावसाअभावी शेतमजूरांनाही कामे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काही शेतकर्यांनी कोबी आणि टमाटा पिकाची लागवड केली होती. मात्र पिकावर करपा,पाकोळी अशा रोगांचा प्रादुर्भाव असल्याने शेतकर्यांचे अधिकच नुकसान झाले आहे.मका,बाजरी ही पिके अत्यंत केविलवाण्या स्थितीत आहेत. पिकांची वाढ खुंटली असून पुढील चार-पाच दिवसात पुरेसा पाऊस न झाल्यास ती पिके वाया जातील. गेल्या आठ दिवसात तर तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी मका, बाजरी ही खरीप पिके सोडली आहे. कोबी पिकाला प्रचंड खर्च झालेला आहे मात्र हे पिकही रोगाला बळी पडत आहे. यंदा कोबी पिकावर फवारणी करूनही फवारणीचा उपयोग होत नाही आहे. उलट फवारणीसाठी केलेला खर्च व्यर्थ ठरतो आहे. यंदा पाऊसच न पडल्याने विहिरी कोरड्या आहेत. पैसा मिळणारे ह्या हंगामातील शेवटचे पिक होते मात्र रोगाच्या प्रादुर्भावाने तेही निम्याहून अधिक खराब झाले असून खर्चही वसूल होईल की नाही अशी परिस्थिती आहे. - रवींद्र वाघ, शेतकरी, .