सातपूर : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्ताने केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नाशिक पश्चिम मतदारसंघातील सुमारे पाच हजार ‘आरोग्य कार्ड’चे वाटप करण्यात आले.पाइपलाइनरोडवरील नक्षत्र लॉन्स येथे श्वास फाउंडेशनच्या वतीने आयोजित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्ताने आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, प्रदेश प्रवक्ते सुहास फरांदे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सातपूर मंडल अध्यक्ष शशिकांत जाधव, सभागृह नेते सतीश सोनवणे, हिमगौरी आडके, महिला अध्यक्ष रोहिणी नायडू, नगरसेवक पल्लवी पाटील, माधुरी बोलकर, पवन भगूरकर, गिरीश पालवे, मंगल खोटरे, अमोल पाटील, श्रीपाद कुलकर्णी, पांडुरंग खोटरे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वितरण करण्यात आले.प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी केले. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली व श्वास फाउंडेशनच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जवळपास पाच हजारांपेक्षा अधिक लाभार्थींची नोंदणी केल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘आयुष्यमान भारत’ योजनेचे कार्ड वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:40 AM