सायखेडा : रात्री-अपरात्री पाण्याच्या किंवा सावजाच्या शोधात रस्त्यांवरून धावणारा बिबट्या, काळवीट यांसारख्या जंगली प्राण्यांचा रस्त्याने धावणाऱ्या गाड्यांपासून बचाव व्हावा यासाठी गोदाकाठ भागातील गोदावरी नदीच्या परिसरातील रस्त्यावर वनविभागाच्या वतीने फलक लावून प्राण्यांचा जीव वाचविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.निफाड तालुका गोदावरी, कादवा नद्यांचे खोरे असल्याने काळी कसदार जमीन, मुबलक पाणी यामुळे मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्या, कोल्हे, लांडगा, तरस, रानडुक्कर अशा जंगली प्राण्यांचा वावर नेहमीच असतो. रात्री-अपरात्री सावजाच्या शोधात किंवा पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेने किंवा रस्त्यांवरूनही वन्यप्राणी धावत असतात. या रस्त्याने विविध वाहनेही ये-जा करीत असतात. वाहनांना पाहून हे प्राणी सैरभैर होतात. यातच वाहनांच्या धडकेने ठार झालेल्या वन्यप्राण्यांची संख्या वाढतच आहे. अशा प्राण्यांचा जीव वाचवायला हवा यासाठी वनविभागाच्यावतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे.रस्त्यांच्या कडेला अनेक ठिकाणी पुढे वन्यप्राणी आहेत, वाहने सावकाश चालवा, पुढे जंगली प्राणी रस्ता ओलांडत आहेत अशा प्रकारचे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन या प्राण्यांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे.ठाणे जिल्ह्यात अशा प्रकारचे फलक लावून प्राण्यांचे संरक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्याच्या पूर्व विभागात गोदावरीच्या खोºयामध्ये अशा प्रकारचे फलक लावून प्राण्यांचे संरक्षण करण्याचे काम वनविभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.
सावधान! पुढे वन्यप्राणी आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 4:16 PM
रात्री-अपरात्री पाण्याच्या किंवा सावजाच्या शोधात रस्त्यांवरून धावणारा बिबट्या, काळवीट यांसारख्या जंगली प्राण्यांचा रस्त्याने धावणाऱ्या गाड्यांपासून बचाव व्हावा यासाठी गोदाकाठ भागातील गोदावरी नदीच्या परिसरातील रस्त्यावर वनविभागाच्या वतीने फलक लावून प्राण्यांचा जीव वाचविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ठळक मुद्देवनविभागाचा पुढाकार : प्राण्यांना वाचविण्यासाठी लावले फलक