सिडको : नाशिकच्या व्यापारी उद्योजकांना कमीत कमी वेळेत इतर शहरातील उद्योजकांशी संपर्क साधता यावा यासाठी हवाई मार्गाची दळणवळण सोय नियमित सुरू करण्यात यावी त्याच बरोबर हवाई कंपन्यांनी कार्गो सेवा सुरू करावी, असा सूर शहरातील उद्योजकांनी लावला. स्पाइस जेट या हवाई कंपनीच्या अधिकाऱ्यानी गुरुवारी नाशिक येथील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी, नाशिकप्रमाणेच अजूनही देशात अनेक शहरांसाठी हवाई सेवा सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी सर्व औद्योगिक संघटनांनीदेखील पाठपुरावा केल्यानेच हे शक्य झाल्याचे सांगितले. स्पाइस जेट या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीने इतर शहरांबरोबरच गोवा राज्यासाठी सेवा सुरू करावी तसेच मालाची ने-आण करण्यासाठी कार्गो सेवा सुरू करावी, अशी सूचना महाराष्ट्र चेम्बरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली. आयामाचे मनीष रावल यांनी हवाई सेवा कायमस्वरूपी व इतर शहरांना जोडणारी असावी, अशी मागणी केलीे. यावेळी स्पाइस जेटच्या सेल्स व्यवस्थापक किनारी मेहता यांनी येत्या दहा दिवसात औद्योगिक असोसिएशनने मांडलेल्या सूचनांचा अभ्यास करून निपटारा केला जाईल, असे सांगितले. यावेळी आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, नाइसचे उपाध्यक्ष रमेश वैश्य, सुशील धुमाळ, भाविक ठक्कर, ललित बूब, राजेंद्र अहिरे, दत्ता भालेराव आदी उपस्थित होते.
व्यापारवाढीसाठी कार्गो सेवा सुरू व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:54 AM
नाशिकच्या व्यापारी उद्योजकांना कमीत कमी वेळेत इतर शहरातील उद्योजकांशी संपर्क साधता यावा यासाठी हवाई मार्गाची दळणवळण सोय नियमित सुरू करण्यात यावी त्याच बरोबर हवाई कंपन्यांनी कार्गो सेवा सुरू करावी, असा सूर शहरातील उद्योजकांनी लावला. स्पाइस जेट या हवाई कंपनीच्या अधिकाऱ्यानी गुरुवारी नाशिक येथील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली.
ठळक मुद्देउद्योजकांचा सूर : हवाई सेवेविषयी सकारात्मक