शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

उज्ज्वल गोशाळेत जनावरांची जोपासना

By admin | Published: May 30, 2016 10:50 PM

पिंपळगाव बसवंत : प्रीतिसुधाजी म.सा. यांचे मार्गदर्शन

 पिंपळगाव बसवंत : येथील उज्ज्वल गोशाळा ही जनावरांची आधार संस्था बनली असून, शेकडो जनावरे या ठिकाणी अतिशय काळजीने जोपासली जात आहेत.प.पू. प्रीतिसुधाजी महाराज यांच्या संकल्पनेतून उज्ज्वल गोरक्षण संस्थेची ९ डिसेंबर २००६ रोजी स्थापना करण्यात आली. पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशन व स्व. अशोक बनकर नागरी सहकारी पतसंस्था यांच्या पुढाकाराने या गोशाळेची स्थापना झाली. उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना तसेच संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही याठिकाणी जनावरांची खूप चांगल्या प्रकारे निगा राखली जाते. आज याठिकाणी ३६० गायी, १८० बैल व गोऱ्हे, ८ म्हशी, ७५ अपंग जनावरे आहेत. ७५ वासरे आई नसतानादेखील दुसऱ्या गायींच्या दुधावर मोठी करण्यात आली. या गोशाळेत अजून दोन गायी अशा आहेत की त्यांची उंची चार फूट आहे. राजस्थानमध्ये आढळणाऱ्या या रानगायी आहेत. याठिकाणी सध्या पाण्याची टंचाई जरी जाणवत असली तरी बाजार समितीच्या माध्यमातून पाण्याचे टँकर पुरविले जात असून, पिंपळगावचे सर्व कांदा व्यापारी हे आपल्या कुटुंबाची ज्याप्रकारे काळजी घेतात त्याप्रमाणे या गायींची काळजी घेत आहेत. गोशाळेमार्फत शेतकऱ्यांना अल्प मोबदल्यात शेतीकामासाठी बैल देण्यात येतात. येथे जनावरांची पाण्याची वेगळी व्यवस्था व वासरांची वेगळी व्यवस्था करण्यात आली असून, रोजच्या रोज या ठिकाणी डॉक्टर्सकडून जनावरांची तपासणी करण्यात येते. इतकेच नव्हे तर जनावरांसाठी रोज सकाळी व संध्याकाळी गायत्री मंत्र, ओमकार मंत्रासह भक्तिगीते लावली जातात. या गोशाळेसाठी १८ माणसे काम पाहत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून शेकडो जनावरांचा सांभाळ करणारी ही गोशाळा आजही दिमाखात उभी आहे. (वार्ताहर)