नाशिक : भारतीय वायुदलाने ‘मिराज-२०००’ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने पाकव्याप्त काश्मिरात घुसून दहशतवाद्यांचे ‘लॉन्चिंग पॅड’ उद्ध्वस्त करत पुलवामा हल्ल्याचा १३व्या दिवशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकविला. या कारवाईनंतर अवघ्या देशभरात जल्लोष साजरा होऊ लागला. १३ दिवसांपासून गहिवरलेल्या सोशल मीडियाही मग याला अपवाद राहिला नाही. नेटिझन्सकडून भारतीय वायुदलाचे अभिनंदन अन् आभार मानले गेले.मंगळवारी (दि.२६) सकाळी माध्यमांमधून पाकला भारताच्या वायुसेनेने दिलेल्या चोख प्रत्युत्तराची बातमी येताच सोशल मीडियावर सकाळपासूनच #एअरस्ट्राइक, #बालाकोट, #भारतीय वायुसेना, #जोश, #सर्जिकलस्ट्राइक-२ अशाप्रकारचे हॅशटॅग ट्रेंडदेखील सुरू झाल्याचे पहावयास मिळाले. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत सीमापार जाऊन ‘मिराज’ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने बॉम्ब वर्षाव करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले.२१ मिनिटांच्या या कारवाईत भारतीय वायुसेनेने शेकडो दहशतवाद्यांना कं ठस्नान घातले. सोशल मीडियावर एकच चर्चा ऐकू येऊ लागली ती म्हणजे ‘हाउ इज द जोश’.‘‘हाउज द जैश? बॉम्बेड सर..’ #इंडियन एअरफोर्स...’’भारतीय सेना पापी पाकिस्तानला....क्यू हिला डाला ना...हाउज द जोश...हाय सर..हाउज द जैश... डेड सर..आफ्टर इंडियन एअरफोर्स अॅक्शन, इम्रान खान, पीटीआय इज फॉल इन लो बीपी,ये नया हिंदुस्तान हैं.. घर में घुसेगा भी... और मारेगा भी...बाप, आखीर बाप होता हैं...अशा एकापेक्षा एक वाक्यांसह विविध प्रकारचे विनोदी छायाचित्रांच्या पोस्ट दिवसभर समाजमाध्यमांमधून फिरत होत्या.तसेच व्हॉट््सअॅप, फेसबुक या समाजमाध्यमांमध्य्देखील विविध प्रकारच्या पोस्ट या कारवाईनंतर सुरू झाल्या होत्या. अनेकांनी आपले स्टेट््स, प्रोफाइलद्वारे विविध प्रकारचे पोस्ट ठेवून भारतीय वायुसेनेला धन्यवाद देत अभिनंदन केले. त्यामधील काही निवडक पोस्ट अशा...‘‘हम हिंदुस्तानी हैं, १२ दिनो तक शोक रखते हैं, १३ वे दिन काम पर लग जाते हैं... जय हिंद!!आमचा पॅटर्नच वेगळा आहे... आम्ही तोडत नाही डायरेक्ट फोडतो..भारतीय वायूसेनानेटिजन्सकडून स्वागत४०चा बदल्यात ४०० घेतले, भारतीय वायुसेनेचे हार्दिक अभिनंदन...!हिंदुस्तान अब चूप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान हैं...घर में घुसेगा भी और मारेगा भी...आज राजकुमार का फेमस डायलॉग याद आ रहा हैं...हम तुम्हे मारेंगे, और जरूर मारेंगे, लेकिन बंदुक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा, बस जमीन तुम्हारी होगी..
सोशल मीडियावर आनंदोत्सव ; नेटिझन्सकडून भारतीय वायुदलाचे अभिनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 1:00 AM