येवला : यंदा कोरोना व नैसर्गिक आपत्तीने कैऱ्यांना मोठा फटका बसल्याने बाजारात लोणच्याच्या कैºयांची आवक घटली आहे. परिणामी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाउन व संचारबंदीत घसरलेले कैºयांचे दर आता तेजीत आले आहे.ऐन हंगामात कोरोनाचे संकट आले. त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीने दोन महिन्यांपासून बाजारपेठा बंद राहिल्या. तर गावोगावचे आठवडे बाजार व स्थानिक भाजीबाजारही बंद राहिले.शेताच्या बांधावर असणाºया आंब्याच्या झाडांवरील कैरी बाजारात विक्री होऊ शकली नाही. त्यातच नैसर्गिक आपत्तीची भर पडली. वादळी वाºयासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडांवरील कैºया पडल्याने फुटल्या. आता, बाजारपेठा खुल्या होत असताना मात्र कैºयांची आवक घटली आहे. तर चांगल्या कैºया बांधावर चढ्या दराने विक्री होत आहे. तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकºयांचेही यंदा मोठे नुकसान झाले आहे.काही शेतकºयांकडून लहान आकाराची कैरी २५० ते ३०० रु पये शेकडा दराने तर मोठी कैरी ४०० ते ४५० रुपये शेकडा दराने विक्र ी केली जात होती. प्रति किलोचा दर २० ते ३० रुपये किलो दरम्यान होता, परंतु वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कैºयांचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारात कैºयांची आवकघटली आहे आणि दरही तेजीत आले आहेत.
बांधावर कैरी विक्र ीला प्राधान्यपहिला पाऊस पडल्यानंतर लागलीच लोणचे करण्याची महिलावर्गाची लगबग सुरू होते. त्यामुळे कैºयांची मागणी वाढते, परंतु यंदा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असणार आहे. परिणामी कैºयांचे दरही तेजीत राहतील. बाजारबंदीमुळे शेतकºयांनी बांधावर कैरी विक्र ीला प्राधान्य दिले असले तरी कैºया उत्पादन मर्यादित राहिले आहे.
मातीच्या बरण्या मिळणे मुश्कीलकैºयांबरोबरच लोणच्यासाठी लागणारे मातीचे मडके वा चिनीमातीच्या बरण्या मिळवण्यासाठी यंदा महिलावर्गाला शोधाशोध करावी लागत आहे. ग्रामीण भागात काही कुंभार कारागीर मात्र घरपोच विक्र ी सेवा देत असले तरी चिनी मातीच्या बरण्या मिळणे मुश्कील झाले आहे.