त्र्यंबकेश्वर : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेवाडी येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गावातील दिनकर शिवा येले (१९) यास अटक करण्यात आली आहे़ दरम्यान शुक्रवारी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर जातपंचायतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक तालुक्यातील राजेवाडी भोकरपाडा येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २३ जानेवारी रोजी संशयित दिनकर शिवा येले याने घरात घुसून अत्याचार केला होता. हा प्रकार पीडितेने घरातील व्यक्तींना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात बुधवारी गुन्हा नोंदवण्याची तयारी केली; परंतु हा प्रकार गावातील जातपंचायतीला समजल्यावर पीडितेच्या वडिलांना गुन्हा नोंदवण्यापासून परावृत्त करत दोघांचे लग्न लावून देण्याचे निश्चित केले. त्याबाबत कागदपत्रे तयार करण्यात आली; मात्र पुढे मुलाच्या घरच्यांनी लग्न लावण्यात येणार नसल्याची चर्चा घडवून आणली. मुलीच्या वडिलांनी अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केल्याने जातपंचायतीने त्यांना वाळीत टाकण्याचे जाहीर केल्याने शुक्रवारी पीडितेच्या वडिलांनी जातपंचायतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. समाजाची बदनामी केली आहेस. यापुढे तू आमच्या कोणत्याही कार्यक्रमात यायचे नाही व आम्ही तुझ्या कार्यक्रमात येणार नाही, तुझ्याशी बोलणार नाही तसेच कोणताच संबंध ठेवणार नाही, असे सांगून कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला. यामध्ये जातपंचायत सदस्य संशयित शिवा सोमा येले, गणपत शिवा येले, धोंडीराम काशीराम येले, बुधा विठू येले, भिवा वाळू गोहिरे, सकरु वाळू शीद , नवसू बुगा भुरबुडे , देवराम काशीराम येले, सरपंच विष्णू खोडे, पोलीसपाटील संतोष भुरबुडे, वाळु शिवा गोहिरे, सोनू चैतू गोहिरे, गोविंदा मंबा शीद, चैतू भिवा गोहिरे, सोनू रतन शीद, सोमा बुधा येले, बाळू काशीराम येले, बच्चू रावजी खंडवी, चैतू बुगा भुरबुडे, सनू गोपाळा शीद, हरी सोमा येले, श्रावण मंगा शीद, काशीराम श्रावण शीद यांचा समावेश आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सामाजिक बहिष्कार अधिनियम २०१६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
बहिष्कार प्रकरणी जातपंचायतीविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:07 AM
त्र्यंबकेश्वर : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेवाडी येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गावातील दिनकर शिवा येले (१९) यास अटक करण्यात आली आहे़
ठळक मुद्देतक्रारीनंतर जातपंचायतीविरुद्ध गुन्हा दाखलअत्याचार केल्याप्रकरणी दिनकर येले यास अटक