लासलगाव : जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या लिलाबाई वाघ या महिलेचा शॉक लागून मृत्यू प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद येथील विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. के. पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एन. एम. उंबरे पुढील तपास करीत आहेत.लिलाबाई वाघ यांच्या मृत्यूमुळे विज वितरणचा गलथान कारभार समोर आला असून महावितरण विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.दि. ६ व ७ जून रोजी निफाड तालुक्यात वादळी वाºयासह झालेल्या जोरदार पावसामुळे शिरवाडे वाकद येथे अनेक वीजेचे पोल जमिनीवर पडले तर काही वाकून त्यांच्या वायरी जमिनीपासून पाच सहा फुटावर लटकत असून तर काही वायरी जमिनीवर पडून असतांना त्यातून विद्युत प्रवाह सुरू असलेला विद्युत प्रवाह बंद करणे गरजेचे होते. मात्र त्यातून विद्युत प्रवाह सुरू ठेवल्याने जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या लिलाबाई यांचा या विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेवर पाय पडला व शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
महिलेच्या मृत्यूप्रकरणी विज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 9:01 PM
लासलगाव : जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या लिलाबाई वाघ या महिलेचा शॉक लागून मृत्यू प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद येथील विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्दे महावितरण विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला