लासलगाव : पत्नी शीतल भारत घोटेकर हिचा साथीदाराच्या मदतीने अमानुषपणे खून करून चार दरोडेखोरांनी लासलगाव-कोळपेवाडी रस्त्यावर सात मोरी भागात मोटारसायकल अडवून पत्नीवर बलात्कार केल्याचा बनाव करणारा पती भारत धोक्र ट व त्याचा साथीदार गुलाब निवृत्ती ठाकर यांना निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. मंत्री यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, दि. ३ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील रावळगाव जळगाव येथून बाळंत झालेल्या मेहुणीची भेट घेऊन पत्नी शीतल भारत धोक्रट (२७) हिचेसह सिन्नर तालुक्यातील कोळगाव येथे मोटारसायकल क्र मांक एमएचव्ही ५५८७ ने घरी जात असताना चार दरोडेखोरांनी मोटारसायकल अडवून मारहाण करून खिशातून मोबाइल काढून घेतला त्याचबरोबर शस्त्राचा धाक दाखवून पत्नीवर बलात्कार करून तिचा खून केला, अशी फिर्याद विवाहितेचा पती भारत गणपत धोक्र ट याने लासलगाव येथील पोलीस ठाण्यात दिली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्र म देशमाने , पोलीस उपअधीक्षक संदीप आटोळे यांच्यासह तत्कालीन पोलीस निरीक्षक नीलेश माइनकर घटनास्थळी पोहोचले; परंतु हा पूर्णपणे बनाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पत्नी शीतल हिच्याशी पटत नसल्याने पती भारत याने त्याचा साथीदार गुलाब निवृत्ती ठाकर याच्या मदतीने तिचा अमानुष खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी निफाड जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. मंत्री यांच्यासमोर खटला सुरू होता. या खटल्याच्या कामकाजात जिल्हा सहायक सरकारी वकील अॅड. व्ही. एन. हाडपे यांनी दहा महत्त्वाचे साक्षीदार तपासले. या खटल्याचा निकाल मंगळवारी लागून पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालयाने पती भारत धोक्र ट व त्याचा साथीदार गुलाब ठाकर या दोघांना जन्मठेप व दोन हजार रु पये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.