श्याम बागुलनाशिक : तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून आमदाराने शासकीय बैठक घ्यावी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून कांद्याच्या पिकावर विषारी औषध सेवन करून आत्महत्या करणाऱ्या शेतक-याच्या कुटुंबीयाच्या सांत्वनासाठी जाताना तहसीलदाराने अंगावर दणकट आभूषणांचे प्रदर्शन करावे, या दोन्ही घटनांची छायाचित्रे सोशल माध्यमांवर ज्या वेगाने व्हायरल होत आहेत व त्यावर ज्या काही समाजाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत ते पाहता, या घटनाआड महसूल विभागात जी काही छुपी राजकीय व शासकीय लढाई सुरू आहे, त्याला पृष्टी मिळत आहे. दुसरीकडे या अशा घटनेमागची कारणेदेखील व्यवस्थेविषयीची हतबलता अधोरेखित करीत आहे.खुर्ची कुठलीही असली तरी तिच्या सोबत जबाबदारी जशी येते, तसेच खुर्ची कर्तव्य व सामाजिक भानही करून देते. उपरोक्त दोन्ही घटनांचा संदर्भ खुर्चीशी अगदीच जवळचा आहे. नाशिक तहसील कार्यालयात दक्षता समितीचे अध्यक्ष आमदार योगेश घोलप यांनी बैठक घेतली. अनेक वर्षांनंतर झालेल्या या बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय घेतले याची चर्चा होण्यापेक्षा आमदाराने चक्क तहसीलदारांच्या खुर्चीवर ठाण मांडल्याचे छायाचित्र व त्यावर उठलेल्या प्रतिक्रियांचीच चर्चा अधिक झाली. अर्थात ही चर्चा कोणा राजकीय व्यक्तींनी झडवली असते तर समजण्यासारखे होते, परंतु या चर्चेचा उगमस्रोत हा शासकीय अधिका-यांमध्येच दडलेला असल्याचे ज्यावेळी स्पष्ट झाले, त्यावेळी त्याचे गांभीर्य अधिकच वाढले. मुळात तहसीलदाराला दंडाधिका-याचा दर्जा असून, त्या पदाची गरिमा काही औरच आहे, त्या पदावर कोण विराजमान आहे याला फारसे महत्त्व तसे नसतेही पण खुर्चीला असलेले महत्त्व पाहता, त्यावर एखाद्या आमदाराने विराजमान होणे तसे त्या खुर्चीची गरिमा कमी करण्यासारखेच आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे या घटनेची चर्चा होणे स्वाभाविक असले तरी, प्रत्येक गोेष्टीत राजकारण पाहण्याची सवय जडलेल्या यंत्रणेने आमदाराचे तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याच्या घटनेचा संदर्भ राजकारणाशी जोडला. नाशिकच्या माजी तहसीलदाराला लागलेले विधानसभा निवडणुकीचे वेध व त्यातही ज्याने तहसीलदाराच्या खुर्चीत बस्तान मांडले त्या आमदाराच्या विरोधातच रणांगणात उतरण्याची त्यांनी सुरू केलेली तयारी पाहता, त्यातूनच घटनेला नको तितकी हवा दिली गेली. परंतु मुळात तहसील कार्यालयात शासकीय समित्यांच्या बैठका घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था व सोयी, सुविधांची वानवा आहे. आमदार हा समितीचा अध्यक्ष असल्याने त्याने मोठ्या (तहसीलदारच्या) खुर्चीवर विराजमान होणे व समितीचा सचिव असलेल्या तहसीलदाराने क्रमाने दुस-या असलेल्या खुर्चीवर बसणे क्रमप्राप्त आहे. अशा परिस्थितीत तहसीलदाराच्या खुर्चीवर आमदाराने विराजमान होणे न होणे चूक की बरोबर हे ठरविणे अवघड आहे.दुसºया घटनेत मालेगावच्या तहसीलदाराला अशाच प्रकारे सामाजिक टीकेचे धनी व्हावे लागले आहे. मालेगाव तालुक्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच दिवशी तीन शेतक-यांनी जीवन संपविले, त्यातील एकाने तर खळ्यावर काढून ठेवलेला व सडत चाललेल्या कांद्यावर बसून विष प्राशन करून स्वत:चा शेवट केला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने दु:खात असलेल्या शेतकरी कुटुंबाच्या सांत्वनासाठी गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावर सोन्याच्या आभूषणांचा साज पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. सोशल माध्यमावर त्याचे छायाचित्र व सामाजिक भानची जाणीव करून देणा-या प्रतिक्रियांची राळ उठणे स्वाभाविक आहे, त्यातही शासनाचे प्रतिनिधित्व करणा-या राजपत्रित अधिका-याकडून असे प्रदर्शन होणे अधिकच गांभीर आहे. आभूषणे हा महिलांचा आवडता छंद असल्याने प्रत्येकाने आपला छंद किती व कसा पूर्ण करावा, हा प्रत्येकाचा वैयक्तिक मामला असला तरी, त्याचे कोठे व कसे प्रदर्शन करावे याचे काही अलिखित संकेत आहेत. मालेगावच्या घटनेत व्हायरल होत असलेल्या छायाचित्रावरून टीका होत असली तरी, ज्या परिस्थितीत तहसीलदाराला घटनास्थळ तातडीने गाठावे लागले त्याचा विचारही होणे क्रमप्राप्त आहे. कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी तयारी सुरू असताना बळी राजाने मृत्युला कवटाळल्याच्या वृत्ताने झालेली घालमेल शासनाचे प्रतिनिधित्व करणा-या तहसीलदारांनी सामाजिक भान विसरून कर्तव्याला प्राधान्य दिले तर चुकले कोठे?
किस्सा कुर्सीका !
By श्याम बागुल | Published: January 23, 2019 3:54 PM
खुर्ची कुठलीही असली तरी तिच्या सोबत जबाबदारी जशी येते, तसेच खुर्ची कर्तव्य व सामाजिक भानही करून देते. उपरोक्त दोन्ही घटनांचा संदर्भ खुर्चीशी अगदीच जवळचा आहे. नाशिक तहसील कार्यालयात दक्षता समितीचे अध्यक्ष आमदार योगेश घोलप यांनी बैठक घेतली. अनेक वर्षांनंतर झालेल्या या बैठकीत
ठळक मुद्देतहसीलदाराने अंगावर दणकट आभूषणांचे प्रदर्शन करावे, महसूल विभागात जी काही छुपी राजकीय व शासकीय लढाई सुरू