आकाश दिनकर ताचे (२३ रा.मुंबई) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, तो सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणी मकसूद मोहम्मद शेख (रा.गंजमाळ) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केले आहे. शेख कुटुंबीय मंगळवारी (दि.१९) दुपारी आपल्या कामात व्यस्त असताना ही घटना घडली. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत संशयिताने घरात प्रवेश केला. यावेळी त्याने मांडणीवर चार्जिंगला लावलेला मोबाइल काढला. त्यानंतर, खुंटीला अडकविलेल्या पॅन्टच्या खिशामधून तीन हजारांची रोकड काढताना शेख कुटुंबीयांच्या हाती लागला. कुटुंबीयांनी त्यास चोप देत, पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----
आडगावला भरदिवसा ४५ हजारांची घरफोडी
नाशिक : कुटुंबीय कार्यक्रमासाठी घराबाहेर पडल्याची संधी साधत, चोरट्यांनी घरफोडी करून ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. ही घटना नांदूर गाव लिंक रोड भागात घडली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील सुखदेव नन्नावरे (रा.ब्रह्मगिरी सोसा.) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नन्नावरे कुटुंबीय सोमवारी (दि.१८) सकाळी नातेवाइकाच्या साखरपुड्यासाठी सिडको भागात गेले असता, ही घटना घडली. कुटुंबीय कार्यक्रमास गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सात हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
------
‘त्या’ वृक्षाच्या कत्तलप्रकरणी गुन्हा
नाशिक : चोरीच्या उद्देशाने अज्ञात संशयितांनी डिसुजा कॉलनीजवळील शहीद सर्कल चौकात असलेेले समुमारे ३५ वर्षे जुने आंब्याचे झाड पहाटेच्या सुमारास कटरच्या साहाय्याने कापून पळ काढल्याचा प्रकार उघडकीस आला होता. संशयित झाड कापत असताना, येथील एका बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते. या प्रकरणी मनपा उद्यान विभागाचे कर्मचारी किरण गणेश बोडके (रा.गणेशवाडी रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (दि.१६) पहाटेच्या सुमारास ही बाब उघडकीस आली होती. मेघा सोसायटीला लागून असलेल्या सार्वजनिक रस्त्यावरील ४० ते ४५ फूट उंचीचे आंब्याचे झाड अज्ञात चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने कापून टाकले होते. चोरीच्या उद्देशाने झालेली ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्याने एकच खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटल्याने महापालिकेने या घटनेची दखल घेतली गुन्हा दाखल केला आहे.
------