नाशिक : आपले जात पडताळणीचे प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, माजी पंचायत समिती सभापती मंदाकिनी भोये यांनी अभ्यास न करताच आरोप केल्याचे खासदार पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आदिवासी विकास विभागासमोर आपल्या जात पडताळणीसंदर्भात बिनबुडाचे आरोप करीत मंदाकिनी भोये यांनी आंदोलन केले. वास्तविक पाहता आपल्या जात पडताळणीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना कोणताही अभ्यास न करताच हे आंदोलन करण्यात आल्याचे कलावती भिवाजी चौधरी ऊर्फ कलावती हरिश्चंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
जात प्रमाणपत्र न्यायालयीन बाब : कलावती चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 7:45 PM