पश्चिम प्रभाग समितीची बैठक बुधवारी (दि.१६) सभापती ॲड. वैशाली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्वच सदस्यांनी तक्रारी केल्या. गावठाण भागात पूर्वपरवानीशिवाय बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून, दहीपूल, मेनरोडसह अनेक भागात कामे सुरू असताना त्याला परवानगी नाही अशी स्थिती आहे. विनापरवानगी सुरू असलेल्या या बांधकामाच्या ठिकाणी रस्त्यापासूनचे सामासिक अंतर आणि अन्य कोणतेही नियम पाळले जात नसून त्यामुळे भविष्यात गंभीर स्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नेहरू चौकापर्यंत पुराचे पाणी येत असल्याने नदीकडील बाजूने पूररेषेत बांधकामे करता येत नाही, महापालिका परवानगीदेखील देत नाही. मग याच ठिकाणी बांधकामे सुरू असताना नगररचना विभागाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न वत्सला खैरे यांनी उपस्थित केला. अनेक बांधकामांना परवानगी नसताना कामे सुरू असल्याने प्रत्यक्ष जागेवर पाहणी करावी, अशी सूचना सभापती वैशाली भोसले यांनी केली. तर बेकायदेशीर बांधकामे सुरू असतील तर तत्काळ कारवाई करण्याची सूचना गजानन शेलार यांनी केली. बैठकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये बेेंचेस बसवण्याचे सुमारे २२ लाख रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. बैठकीस विभागीय अधिकारी एम. टी. हरिश्चंद्र, नगररचनाचे संजय अग्रवाल, संदेश शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे दयानंद आहेर, भूगयोचे शिंगाडे आदी उपस्थित हेाते.
इन्फो..
मेनरेाडवरील अतिक्रमणे एक महिन्यात काढण्याचे आदेश
मध्य नाशकात मेनरोडसह अन्य भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, ती हटवण्याचे आदेश प्रभाग समितीत देण्यात आले आहेत. मेनरोड, बोहोरपट्टी या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असून, ती तत्काळ हटवावीत अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यानुसार हे आदेश देण्यात आले.
------------
छायाचित्र आर फोटोवर १६ प्रभाग नावाने सेव्ह... मनपाच्या पश्चिम प्रभाग समितीच्या बैठकीप्रसंगी सभापती ॲड. वैशाली भोसले. समवेत विभागीय अधिकारी एम. टी. हरिश्चंद्र, गजानन शेलार, शिवाजी गांगुर्डे, वत्सला खैरे, समीर कांबळे, पोपटाराव नागपुरे आदी.