ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापूर येथे दोन तरु णांनी पाडसाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका करून जीवदान दिले.येथील राजेंद्र वैद्य व सोपान शिंदे हे तरु ण ममदापूर- रेंडाळा रस्त्याने जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला काही कुत्रे हरणांच्या कळपाच्या मागे धावताना दिसले. त्याचवेळी हरणाच्या चार ते पाच दिवसाच्या पाडसावर कुत्रे हल्ला करताना दिसले. त्यांनी लगेचच गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून पाडसाकडे धाव घेतली व पाडसाची सुटका केली. त्यानंतर प्राणिमित्र गोरख वैद्य यांना ही माहिती दिली.यासंदर्भात वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना कळविले. थोड्याच वेळात पोपट वाघ, रवींद्र निकम, बापू वाघ हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाडसाला राजापूर येथील वनविभागाच्या कार्यालयात पोहचविले. पुढील उपचारासाठी वन विभागाचे अधिकारी सदर पाडसाला घेऊन गेले. पाडसाच्या मागील पायाला कुत्र्याने चावा घेतला आहे. परंतु सतर्कतेमुळे पाडसाचा जीव वाचल्याने वनविभागाने तरुणांचे कौतुक केले. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी हरणांच्या मृत्यूचे वाढले असून, हरणांना जंगलात पिण्यासाठी पाण्याची व हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच या भागातील कुत्र्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.- गोरख वैद्य, प्राणिमित्र, ममदापूरजखमी पाडसावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी राजापूर येथील वनविभागाच्या कॉलनीत देण्यात आली असून, उपचार करून येथील ५ एकर क्षेत्रावरील तार कंपाउण्डच्या आत सोडण्यात येईल त्याची तब्येत चांगली झाल्यानंतर जंगलात सोडण्यात येईल.- ज्ञानेश्वर वाघ, वनरक्षक, राजापूर
तरु णांमुळे वाचला पाडसाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 11:50 PM
ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापूर येथे दोन तरु णांनी पाडसाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका करून जीवदान दिले.
ठळक मुद्दे तब्येत चांगली झाल्यानंतर जंगलात सोडण्यात येईल.