दिंडोरी/येवला : घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे जलपूजन वरुणराजाच्या साक्षीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व फलक अनावरणाने करण्यात आले. यावेळी दिंडोरी, चांदवड, निफाड व येवल्यातील शेतकरी उपस्थित होते.महाराष्ट्राच्या धरतीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवून वळविला तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. पाणी वळविल्यामुळे गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला मिळू शकले. आता नार-पारचे पाणी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी केले. वाहून जाणारे पावसाचे पाणी देवसाने प्रकल्पाद्वारे पुणेगाव धरणात येऊ लागले आहे. धरणातून शेतकºयांना नवसंजीवनी मिळाली असल्याच्या प्रतिक्रि या यावेळी उमटत होत्या. (पान ५ वर)आमदार भुजबळ यांनी यावेळी सदर प्रकल्पाचा प्रवास विशद केला. शासनाने पाच वळणयोजना रद्द केल्या, त्या पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नार-पार प्रकल्पाचे पाणी स्थानिक शेतकरी व महाराष्ट्रातील शेतकºयांना मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी जमीन देणारे सर्व शेतकरी व प्रकल्पास सहकार्य करणाºया सर्वांचे आभार मानले.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार धनराज महाले, दिलीप बनकर, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, जयवंतराव जाधव, रंजन ठाकरे, कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, राधाकिसन सोनवणे, संजय बनकर, महेंद्र काले, साहेबराव मढवई, अरु ण थोरात, भास्करराव भगरे, विजय पाटील, डॉ. योगेश गोसावी आदींसह येवला, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, निफाड तालुक्यातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.घाटमाथ्यावरून गुजरातसह समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोºयात वळविण्यासाठी बारा वळणयोजना व मांजरपाडा प्रकल्पांतर्गत ३४५० मीटर लांबीचे धरण व १०.१६ कि.मी. लांबीच्या बोगद्याद्वारे पाणी पुणेगाव धरणात वळविण्यात आले आहे.झिरवाळ यांनी वेधून घेतले लक्षआमदार नरहरी झिरवाळ यांचे साधे राहणीमान सर्वांना परिचित आहे. जलपूजन सोहळ्याच्यावेळी जोरदार पाऊस पडत होता. त्यावेळी झिरवाळ हे पावसापासून बचाव करण्यासाठी पारंपरिक घोंगडी पांघरून कार्यक्र मास उपस्थित होते. त्यांचे घोंगडी पांघरणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.