नामपूर/सटाणा : सटाण्याचे प्रभारी तहसिलदार विनय गौडा यांनी बारावीची परीक्षा सुरुअसलेल्या जिजामाता कन्या विद्यालय ,सटाणा महाविद्यालय, कपालेश्वर विद्यालय या परिक्षा केंद्रांना आकस्मिक भेट दिली. यावेळी जिजामाता विद्यालयात सहा विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध कॉपी केस करण्याचा प्रस्ताव उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठविला आहे.उच्च माध्यमिक शिक्षणमंडळातर्फे सध्या बारावीची परीक्षा सुरू असून, शनिवारी भौतिक शास्त्राचा पेपर होता. मंडळाच्या भरारी पथकातर्फे परिक्षा केंद्राना आकस्मात भेटी देवून कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. प्रभारी तहसिलदार यांच्या पथकाने शनिवारी परिक्षा केंद्रांना भेटी दिल्या. सटाणा महाविद्यालयाबाबत समाधान व्यक्त केले.मात्र जिजामाता विद्यालय या केंद्रावरील ६ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले.त्यांच्याविरुद्ध कॉपी केस करण्यात आली. कपालेश्वर येथील प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करीत उद्यापासून अशी परिस्थिती आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यांसह सुपरवायजर, केंद्रसंचालक यांचेवर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा दिला आहे. उद्या सर्व परिक्षाकामी नेमणूक दिलेले तसेच संबधित शाळा मुख्याध्यापक यांची परिक्षेपूर्वी सकाळी १०-१५ मिनिटांची तातडीची सभा घ्यावी .लेखी व तोंडी सूचना देऊन बैठकीचे इतिवृत्त ठेवावे .व सत्यप्रत सहायक परिक्षकामार्फत पाठवावी यात हयगय झाल्यास केंद्रसंचालक व संबधित व्यक्तीगत जबाबदार राहातील असा इशाराही यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)
सटाण्यात सहा विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले
By admin | Published: March 06, 2017 12:50 AM