शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

‘सायबर गुन्हेगारांपासून खबरदारी आवश्यक’

By admin | Published: November 14, 2016 1:18 AM

‘सायबर गुन्हेगारांपासून खबरदारी आवश्यक’

नाशिक : बँकेतून बोलतोय, तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक केले आहे, ते पुन्हा सुरू करण्यासाठी एटीएम नंबर व पिनकोड सांगा, अशा विविध क्लृप्त्या वापरून सायबर गुन्हेगार नागरिकांनी कष्टाने कमावलेली संपत्तीची काही सेकंदात लूट करतात़ त्यामुळे अशा भामट्यांपासून बचाव करण्यासाठी आता नागरिकांनाच जागरूक व्हावे लागणार आहे़ याचे प्रमुख कारण म्हणजे देशाची वाटचाल ही डिजिटलकडे होत चालली असून, येत्या दोन वर्षांत डिजिटलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे प्रतिपादन सायबर तज्ज्ञ विकास नाईक यांनी शनिवारी (दि़१२) एचआरडी सेंटर येथे केले़ रोटरी क्लब आॅफ नाशिक वेस्ट, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विधी महाविद्यालय व आविष्कार या संस्थांमार्फत विधी साक्षरता उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ‘सायबर गुन्हे व उपाययोजना’ या विषयावर सायबर तज्ज्ञ विकास नाईक व अ‍ॅड़ नागनाथ गोरवाडकर यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी आयोजित व्याख्यानात नाईक बोलत होते़ नाईक यांनी सांगितले की, बहुतांशी नागरिकांकडे स्मार्ट फोन आहेत, याद्वारे इंटरनेटचा वापर करून अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केले जातात़ यावेळी सावधानता न बाळगल्यास आपली गोपनीय माहिती लिक होऊ शकते़ मोबाइल तंत्रज्ञानाच्या फायद्यांबरोबरच तोटेही असून हॅकर माहिती मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. या उपक्रमाद्वारे दर पंधरा दिवसांनी कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सांगितले़ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल रोटेरियन दादासाहेब देशमुख उपस्थित होते़ प्रास्ताविक अ‍ॅड़ इंद्रायणी पटणी यांनी केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वरी बालाजीवाले यांनी तर आभार प्राध्यापक चारुशिला खैरनार यांनी मानले़ (प्रतिनिधी)