शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी
2
इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...
3
...म्हणून पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून काढलं; कारण वाचून तुम्हीही डोक्याला लावाल हात
4
माझ्या बापाविषयी बोलाल तर खबरदार, तुमचे काय वाईट केले: जयश्री थोरात यांचा पलटवार
5
मॉडेलिंगचं स्वप्न, १५ वर्षे मोठ्या अधिकाऱ्यासोबत लग्न, घटस्फोटानंतरही राहत होते एकत्र, आता सापडला तरुणीचा मृतदेह  
6
नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे!
7
"बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून...", साक्षी मलिकचा मोठा दावा
8
ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!
9
१५९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच HSBC मध्ये महिला CFO ची नियुक्ती; पाहा कोण आहेत पाम कौर?
10
७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीने वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणतात...
11
"शब्द दिला असताना तिकीट नाकारलं"; संदीप नाईकांचा भाजपला रामराम, तुतारी हाती घेण्याची शक्यता
12
सर्फराज खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; भारतीय खेळाडू आता 'बापमाणूस'!
13
१२ दिवसांपूर्वीच लेकीचं लग्न, ६ दिवसांआधी डॉक्टरांना मिळाली नोकरी; दहशतवाद्यांनी घेतला जीव
14
"८ हजार डॉलर देतो, माझी हो", सोहेल खानच्या Ex पत्नीला व्यक्तीने दिलेली ऑफर, सांगितला विचित्र प्रसंग
15
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
16
Video: कॉन्सर्टमध्ये चाहत्याने गर्लफ्रेंडला अंगठी घालून केलं प्रपोज, श्रेया घोषाल म्हणाली- "मंत्र पण वाचायचे का?"
17
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
18
Adani News : अदानींच्या झोळीत बिर्ला समूहाची सिमेंट कंपनी, वृत्तानंतर शेअरमध्ये जोरदार तेजी
19
Devayani Farande : फरांदे समर्थकांचे फडणवीसांना साकडे; माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन
20
क्राइम पेट्रोलमध्ये पोलीस अन् खऱ्या आयुष्यात हातात बेड्या! प्रेमात वेडी झाली अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या भाच्याचंच केलं अपहरण

खबरदारी : मेनरोडसह बाजारपेठांमध्ये आता सम-विषमची आखणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 5:34 PM

शासनाने सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आणि अडीच ते तीन महिन्यांनंतर बाजारपेठा सुरू झाल्याने मध्यवर्ती बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे महापालिकेने हा गोंधळ टाळण्यासाठी आता मेनरोडसारख्या बाजारपेठांमध्ये सम आणि विषम तारखेला कोणती दुकाने सुरू राहतील याच्या आखणीला प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्देमिशन बिगेन अंतर्गत शहरात दुकाने सुरूबाजारपेठांमध्ये सम-विषमची आखणी गोंधळ टाळण्यासाठी महापावलिकेचे पाऊल

नाशिक : मिशन बिगेन अंतर्गत शहरात दुकाने सुरू करण्याठी महापालिकेने परवानगी दिली. मात्र, त्यासाठी सम-विषमची अट असतानादेखील ती धुडाकावून सर्वच बाजारपेठा सुरू झाल्याने गोंधळ उडाला. शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने हा गोंधळ टाळण्यासाठी आता मेनरोडसारख्या बाजारपेठांमध्ये सम आणि विषम तारखेला कोणती दुकाने सुरू राहतील याच्या आखणीला मंगळवार (दि.९)पासून प्रारंभ केला आहे. आता त्यानंतरही व्यावसायिकांनी उल्लंघन केल्यास संंबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.  गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून शहरातील सर्व बाजारपेठा बंद आहेत. शासनाने आता सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आणि महापालिका आयुक्तांना यासंदर्भातील शिथिलतेचे अधिकार दिले. त्यानुसार शहरातील बाजारपेठा सुरळीत करण्यासाठी गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि.५) आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यापारी संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली आणि सम-विषम यापद्धतीनेच दुकाने सुरू करता येतील असे सांगितले तर ज्या ठिकाणी सम-विषम लागू करण्यायोग्य बाजारपेठा नाही त्याबाबत विभागीय अधिकारी निर्णय घेतील, असे जाहीर केले. त्यानंतर शनिवारी (दि.६) बाजारपेठा खुल्या झाल्या; परंतु कोणत्याही प्रकारे सम-विषम तारखानुसार दुकाने सुरू करण्याचे पथ्य पाळले नाही. अडीच ते तीन महिन्यांनंतर बाजारपेठा सुरू झाल्याने मध्यवर्ती बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली.  नाशिकमध्ये आधीच कोरोनाबाधितांची संख्या वाढत जाऊन चारशेच्या पुढे गेली असताना बाजारपेठात झालेली गर्दी धडकी भरवणारी ठरली. त्यातच अनेकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते की, मास्क नव्हते. जंतुनाशकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याबाबतदेखील काळजी घेतली जात नव्हती. त्यानंतर महापालिकेने आता अशाप्रकारे नियम भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने बंद करतानाच संबंधितांच्या विरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. महापालिकेने आता स्वत: सम-विषमच्या अंमलबजावणीस पुुढाकार घेतला आहे. त्यानुसार मेनरोडसह अन्य भागांत बाजारपेठेतील कोणती दुकाने सम तारखेस उघडतील आणि कोणती विषम तारखेस त्यासंदर्भातील आखणी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर मात्र, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे, असे महपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकMarketबाजारShoppingखरेदीconsumerग्राहक