नाशिक : शहरासह जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, याच नियमांनुसार कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठीही परवानगी देण्याची मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन नाशिक (सीसीटीएफएन) तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व क्लास शिक्षकांनी १८ मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लास बंद ठेवले असून, जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही हे कोचिंग क्लास सुरू झालेले नाही. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे अन्य व्यावसायही पूर्वपदावर आले आहेत. त्याचप्रमणे सातारा, वर्धा, पुणे व नंदुरबार जिल्ह्यातील कोचिंग क्लासेलाही स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्याला अनुसरून नाशिक जिल्हा प्रशासनानेही पहिली ते आठवीचे वर्ग वगळून अन्य वर्गांसाठी शासकीय नियम व अटींनुसार कोचिंग क्लास सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन. नाशिकचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय डोशी यांच्यास कुणाल कटारिया, नीलेश सुराणा, कार्याध्यक्ष प्रा. यशवंत बोरसे, प्रा. कारभारी म्हस्के, ज्ञानेश्वर म्हसके आदींनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
(आरफोटो- १४क्लास टिचर) - जिल्हाध्यक्ष सुरज मांढरे यांना निवेदन देताना कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन, नाशिकचे प्रा. कारभारी म्हस्के, प्रा. विजय डोशी, प्रा. ज्ञानेश्वर म्हस्के, प्रा. यशवंत बोरसे, प्रा. नीलेश सुराणा.