नाशिक : सद्यस्थितीत अत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांसाठी शासकीय निर्बंध आहेत. अवघ्या वीस जणांनाच परवानगी असतानादेखील अनेक जण गर्दी क रतात, त्यातच कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनादेखील संसर्ग झाल्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे महापालिकेने आता शहरातील स्मशानभूमी व दफनभूमीत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे.शहरातील मनपाच्या मिळकती इतकेच नव्हे तर चौक आणि सार्वजनिक ठिकाणी आणि सिग्नलवरदेखील सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र, आता स्मशानभूमीत बसविण्याचा महापालिकेला निर्णय घ्यावा लागला आहे. सध्या बाहेरगावी जाणाºया येणाऱ्यांमधील अनेकांना तेथे अंत्यसंस्कारासाठी गेल्याने लागण झाल्याचे प्रकार घडले आहेत. यात सातपूर कॉलनीतील एक महिलेने मालेगावातील चिंचगव्हाण येथे अंत्यसंस्कारासाठी हजेरी लावली होती. तिच्या संपर्कातील दहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला, नवी मुंबईत सहकुटुंब अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्याचे त्याच्या मृत्यू पश्चात स्पष्ट झाले. त्याच्या संपर्कातील १३ जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व स्मशानभूमी आणि दफनभूमीत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील स्मशानभूमींमध्ये बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 9:56 PM